प्रादेशिक

मुंबईतील वाहनांवर लागणार स्टिकर, पाहा; हिरवा, पिवळा व लाल रंगाचा स्टिकर कशासाठी आहे?

मुंबईतील वाहनांवर लागणार स्टिकर, पाहा; हिरवा, पिवळा व लाल रंगाचा स्टिकर कशासाठी आहे?
● अत्यावश्यक सेवेतील खाजगी वाहनांसाठी मुंबई पोलिसांनी जारी केले तीन रंगांचे स्टिकर

महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : राज्यभरात चालू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेच्या खाजगी वाहनांसाठी ३ रंगांचे स्वतंत्र स्टीकर देण्याचा निर्णय घेतला आहे. खाजगी वाहनांवर ३ रंगांचे स्टिकर कोड बसवण्यात येणार असल्याचे शनिवारी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नारळीकर यांनी सांगितले.

कलम १४४ नुसार, शहरात रंगाचे स्टिकर असणारी वाहनेच फक्त चालणार. लाल, पिवळा, हिरवा या ३ रंगांचा वापर केला जाणार. हे स्टिकर वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला देखील लावण्यात येणार. पोलीस आयुक्त हेमंत नारळीकर यांनी सांगीतिले कि, कलर कोडचा दुरुपयोग झाल्यास आयपीसी कलम ४१९ नुसार, पोलीस कारवाई करणार.(Mumbai Police has issued color code stickers for private vehicles) 

असे आहेत कलर कोड : यात डॉक्टर, ऍम्ब्युलन्स आणि मेडिकल सेवांच्या वाहनांसाठी लाल रंग, भाजीपाला, फळे, दूध, बेकरी इतर खाद्यपदार्थांच्या वाहनांसाठी हिरवा रंग, बीएमसी कर्मचारी, वीज विभाग, टेलिफोन विभाग, पत्रकारिता विभाग व इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पिवळ्या रंगाचा स्टिकर असणार.

प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कलर कोड स्टिकर मिळणार. विनाकारण खाजगी वाहने घेऊन फिरणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यासाठी आणि वाढते ट्रॅफिक रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हि कल्पना केली आहे. या स्टिकरचा दुरुपयोग करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.