महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : शिरोली ( ता. खेड ) गावच्या हद्दीत ढुम्या डोंगराच्या पायथ्याशी जमिनीच्या आर्थिक वादातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल बाबाजी सावंत ( वय 22, रा. शिरोली, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मद्य पार्टीनंतर जमिनीच्या आर्थिक देवाणघेवाण वरून झालेल्या वादातून त्याची हत्या करण्यात आली. खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. हेमंत वाडेकर ( वय २५, रा. शिरोली ता. खेड ) व शिवा कुडेकर ( वय २६ रा. चव्हाण मळा, पाबळ रोड, राजगुरूनगर ) अशा दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील पवार हा फरार झाला असुन पोलिस त्याचा शोध घेत आहे.
पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार स्वप्नील गाढवे, शेखर भोईर, सचिन जतकर, निखिल गिरीगोसावी यांनी आरोपींना जेरबंद केले आहे. खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.