महाबुलेटीन न्यूज
लोणावळा : लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकमतचे पत्रकार विशाल यशवंत विकारी यांची, सचिवपदी प्रशांत पुरुषोत्तम पुराणिक व उपाध्यक्ष पदी नितिन एकनाथ तिकोणे, प्रसिद्धप्रमुख पदी संतोषी तोंडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाची बैठक लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय इमारतीमध्ये शनिवारी दुपारी लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व नगरसेवक निखिल कविश्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये नियोजित एक वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने कविश्वर यांनी राजिनामा दिला. तर नुतन अध्यक्ष पदासाठी विशाल विकारी यांचे एकमेव नाव समोर आल्याने सर्वांनी एकमताने ही निवड जाहिर केली. यानंतर विशाल विकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशांत पुराणिक, नितिन तिकोणे व संतोषी तोंडे यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार व माजी अध्यक्ष बंडू येवले उपस्थित होते.
विशाल विकारी यांनी 2009-10 साली लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्षपद भुषविले होते. तसेच ते मावळ तालुका कबड्डी असोसिएशनचे खजिनदार, संपर्क बालग्राम संस्थेचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, लोणावळा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष, शिवक्रांती एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान समिती सहसचिव अशा विविध सामाजिक संस्थावर कार्यरथ आहेत. मागील 16 वर्षापासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. आतापर्यत त्यांनी लोकसत्ता, पुण्यनगरी, लोकमत, तरुण भारत या नामवंत दैनिकांमध्ये वार्ताहर म्हणून काम केले आहे. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी केलेल्या लिखानाची विविध सामाजिक संस्थांनी दखल घेत त्यांना तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, तसेच लोकमतचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.