स्पर्धा/परीक्षा

मिशन यू पी एस सी : अभ्यासाचा “श्रीगणेशा”

              UPSC परिक्षेची तयारी करताना अभ्यासात सुसूत्रता व नियोजन असणे, हे अधिक उपयुक्त ठरते. मागील लेखात आपण पाहिल्याप्रमाणे परीक्षेचा क्रम जरी पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणी असा असला तरी मुख्य परीक्षेची व्याप्ती मोठी आणि लेखन कौशल्याची गरज असल्याने मुख्य परीक्षेची तयारी अगोदर करणे हे अधिक सोयीचे ठरते.
             या लेखात आपण सामान्य अध्ययन-१ (General Studies-1) या पेपरचे विस्तृत विश्लेषण पाहणार आहोत. या पेपरमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भूगोल, भारतीय कला आणि संस्कृती व समाज या विषयांचा समावेश होतो.
             इतिहासामध्ये १८ व्या शतकाच्या मध्यापासून आजतागायत झालेल्या महत्वाच्या घडामोडींचा समावेश होतो. प्रामुख्याने ब्रिटिशकालीन भारताची व्यवस्था, भारताचा स्वातंत्र्यलढा व त्यातील विविध घटकांचे योगदान आणि स्वातंत्र्योत्तर भारताची जडणघडण यांचा समावेश होतो.
              जागतिक इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती, जागतिक महायुद्धे, वसाहतवाद, राजकीय विचारसरणी आणि समाजावरील परिणाम यांचा समावेश होतो.
              भूगोल या विषयामध्ये जागतिक प्राकृतिक भूगोल व वैशिष्ट्य, साधनसंपत्तीचे जागतिक वितरण (विशेषतः भारत),  भूगोलाच्या विविध शाखांचा समावेश यात होतो.
              त्याच प्रमाणे भारतीय कलांमध्ये प्राचीन ते आधुनिक काळातील विविध कलांचे, साहित्याचे आणि स्थापत्यकलेचा समावेश होतो. यात विशेषतः चालू घडामोडींच्या अनुषंगाने अभ्यास अधिक उपयुक्त ठरतो.
               भारतीय समाज या घटकामध्ये समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. भारतीय समाजातील विविधता व वैशिष्ट्य, महिला व महिला संस्थांची भूमिका, लोकसंख्या आणि संबंधित समस्या, दारिद्र्य आणि विकासासंबंधीच्या समस्या, शहरीकरण आणि जागतिकीकरणाचे समाजावरील परिणाम यांचा अभ्यास करावा लागतो.
               मागील काही वर्षात UPSC चा कल हा  अभ्यासक्रमातील घटकांवर आधारित चालू असलेल्या घडामोडींवर प्रश्न विचारण्यावर जास्त आहे. त्यामुळे उमेदवाराने दररोज चालू घडामोडीवर विशेष लक्ष देऊन अभ्यास करणे गरजेचे आहे.
प्रा. मयूर दिलीप जायभाय
सहाय्यक निर्देशक @ BlitzIAS अकॅडमी
Panel member @ MCED (MH Govt)
Member of National Rural Entrepreneurship Mission (MHRD)
admin

Share
Published by
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.