महाबुलेटीन न्यूज : गणेश लवंगे
निगडी : सामाजिक बांधिलकी व नैतिक जबाबदारी म्हणून प्लाझ्मा दान करण्याची गरज असून कोरोनाचे संकट गणरायाच्या कृपेने दूर होईल, असे विचार नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी प्लाझ्मा दान करताना मांडले.
सामाजिक बांधिलकीतून व नैतिक जबाबदारी समजून मी आज आपला प्लाझ्मा दान केला आहे, सध्या प्लाझमाची कोरोना रुग्णांना अत्यंत गरज दिसून येत आहे. एका प्लाझ्मादानाने आपण दोन रूग्णांचे प्राण वाचवू शकता. एकजूटीने कोरोनाला हद्दपार करूया, मी प्लाझ्मादान करून एक छोटासा प्रयत्न जनजागृतीचा केला आहे. असे विचार भाजप नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी प्लाझ्मादान केल्यानंतर मांडले.
केंदळे म्हणाले की, “सध्या कोरोना विरुद्धच्या संघर्षातही डॉक्टर आणि पोलिसांनी सामाजिक भान राखत प्लाझ्मा दान केला आहे. कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान दिसून आले. त्याच प्रमाणे भाजप शहर अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी सुद्धा प्लाझ्मा दान केला आहे. तसेच त्यांनी शहरातील सर्व कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना आवाहन केले आहे की, आपण प्लाझ्मा दान करावा, त्या अनुषंगाने एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आज माझा प्लाझ्मा दान केला आहे”.
समाजात समाज सेवा करताना सामाजिक क्षेत्रात पदावर काम करणाऱ्यानी तसेच प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श व्यक्ती असो किंवा प्रसिद्ध व्यक्ती म्हणून मानले जाते अशा व्यक्तींनी समाजापुढे आदर्श ठेवला तरच कोरोनामुक्त झालेली प्रत्येक व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यास पुढे येईल आणि कोरोना रुग्णांना उपचारासाठी मदत होईल व आपला महाराष्ट्र तसेच देश लवकर कोरोनामुक्त होईल, असा विश्वास या वेळी केंदळे यांनी व्यक्त केला
श्री गणरायाचे आगमन होत असताना समाजावर असणारे कोरोनाचे संकट सुद्धा गणरायाच्या कृपेने लवकरच दूर होईल, असा विश्वास नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी व्यक्त केला.
——-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.