महाबुलेटीन न्यूज
चाकण : मेदनकरवाडी गावचे मा. सरपंच, ज्येठ कार्यकर्ते
श्री शांतारामबाप्पू विठोबा मेदनकर ( वय ६८ वर्षे )
यांचे आज शनिवार दि. १७/०४/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी ग्रामपंचायत सदस्य सिंधू, मुलगा माजी ग्रा. पं. सदस्य संदीप, सून माजी ग्रा. पं. सदस्य कावेरी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मारुती भसे यांचे ते सासरे, तर खराबवाडीचे माजी सरपंच, उद्योजक हनुमंतराव कड यांचे ते निकटचे स्नेही होत.
मेदनकरवाडी गावच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक
कार्यात सदैव अग्रेसर असणारे व गावच्या जडणघडणीत सक्रिय सहभाग घेऊन सिंहाचा वाटा उचलणारे एक जेष्ठ व्यक्तिमत्व होते. आपल्या स्वकर्तृत्वावर गावचा नावलौकिक तालुका स्तरावर उंचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गावच्या राजकारणात त्यांचा प्रदीर्घ काळापासून सहभाग होता. त्यांनी मेदनकरवाडी गावचे सरपंचपद तसेच चाकण वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन पद भूषविले होते. आपला राजकीय व सामाजिक वारसा आपल्या पुढच्या पिढीला देत असताना मुलाला व सुनेला एकाचवेळेस ग्रामपंचायत सदस्य बनवणारे ते एकमेव होते. सध्या त्यांच्या पत्नी ग्रा.पं.सदस्य आहेत. संपुर्ण गावात, तालुक्यात ते ‘बाप्पु’ नावाने सर्वपरिचित होते. लहान, थोरांसोबत ते कायम मानसन्मान देऊन आदबीने वागायचे. अतिशय स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या स्वभावाचे वेगळे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण मेदनकर परिवारावर व गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
💐💐💐💐💐💐💐
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.