“मी एक कोरोनायोद्धा” : वाचा कोरोना मुक्त झालेल्या तरुणाचा अनुभव

महाबुलेटीन नेटवर्क : हनुमंत देवकर ( चाकण )
नमस्कार…मी चाकण मधील एक तुमचा स्नेही बोलतोय…
मी स्वतः कोरोनाग्रस्त होतो, मी पूर्णपणे बरा झालो असून चाकण जवळील म्हाळुंगे येथील कोविड सेंटर उपचारासाठी उत्तम असल्याने मी माझा अनुभव आपणास शेअर करीत आहे.
कोरोना हा एक खूप साधारण विषाणू आहे, फक्त याची जी लक्षणे ( symptoms ) आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका.
अलिकडे असे पेशंट ( patient ) भेटत आहेत ज्यांच्या मध्ये काहीच लक्षणे नाहीत पण ते कोरोना पॉझिटिव्ह ( positive ) आहेत, म्हणून घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. फक्त आणि फक्त आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे. मी चाकण एमआयडीसीतील म्हाळुंगे येथील म्हाडा मधील कोविड सेंटर ( covid center ) मध्ये असताना आम्हालाही हेच सांगितलं होतं.
ज्या लोकांना मधुमेह, रक्तदाब, दमा ( श्वसनाचे काही आजार ) असे आजार आहेत, त्या लोकांना जरा जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे, त्या लोकांनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.
शासनाने  कोविड सेंटर मध्ये खूप उत्तम सोय केली आहे.
पिण्यासाठी गरम पाणी, सकाळी चहा-नास्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी 6 वाजता पुन्हा चहा, आणि मग रात्रीचे जेवण असे सर्व अगदी वेळेवर ( time to time ) मिळत होतं.
दररोज सकाळी आणि रात्री दोन वेळेस डॉक्टर्स येत होते, ते आमचे बॉडी टेम्प्रेचर ( body temperature ) आणि ऑक्सिजन लेव्हल ( oxygen level ) चेक करायचे. आमच्यापैकी जर कोणाला काही त्रास होत असेल जसे की सर्दी, खोकला, ताप इत्यादी, तर तिकडे ताबडतोब औषध दिली जात होती.
जर कोणाला खूपच त्रास होत असेल किंवा औषध घेऊन पण काही फरक पडत नसेल तर अश्या पेशंटलाला पुढील उपचारासाठी त्वरित दुसऱ्या हॉस्पिटल ( Hospital ) मध्ये शिफ्ट केले जात असे.
कोविड सेंटर मध्ये आम्हाला व्हिटॅमिन सी ( Vitamin C )  आणि व्हिटॅमिन बी ( Vitamin B ) या गोळ्या दिल्या जात होत्या. ज्यात Vitamin C दिवसातून दोन वेळा, चॉकलेट जशी जिभेवर ठेऊन खातो, तशी घ्यायची असते.
Vitamin B दिवसातून एक वेळा, पाण्यासोबत जशी आपण इतर गोळी ( tablets ) घेतो तशी.
या सर्व कालावधीमध्ये आपण स्वतः घाबरून न जाता सकारात्मक राहणे खूप गरचेचे आहे. आम्ही दोघे भाऊ पॉझिटिव्ह होतो, मात्र कोविड सेंटर मधील उपचारानंतर पूर्ण बरे झालो असून आमचे अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत. तरीही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आमच्या घरात 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करून घेतले आहे. मात्र माझ्या वडिलांना मधुमेह असल्याने त्यांच्यावर YCM रुग्णालयात उपचार चालू आहेत.
कोरोनाला घाबरू नका, दुर्लक्षही करू नका, सकारात्मक राहा, कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरा होतो…आम्ही कोरोनावर विजय मिळविला, तुम्हीही जिंकाल, हीच अपेक्षा…
आपलाच सहकारी : एक चाकणकर ( वय 28 वर्षे )
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.