महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी
म्हाळुंगे : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी येलवाडी ( ता. खेड ) येथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिरूर तालुक्याचे खासदार, संसदरत्न मा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते तपासणी करून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. डॉ. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश बोत्रे, तालुका सरचिटणीस पै. नितीन गाडे, पै. सुधीर गाडे पाटील यांनी येलवाडी गावातील संपूर्ण नागरिकांची आरोग्य तपासणीमध्ये सहभाग घेतला.
यावेळी येलवाडी गावच्या सरपंच हिराबाई बोत्रे, उपसरपंच वर्षा बाळु गाडे, माजी उपसरपंच रणजित गाडे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम दिलीप बोत्रे, लिना संदीप सातव, कल्पना संभाजी गाडे, दीपाली अमित बवले, सागर नंदकुमार गाडे, तानाजी मधुकर गाडे, प्रदीप वसंत गायकवाड, रेखा सोपान बोत्रे, उर्मिला बाजीराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोत्रे, आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश मोहिते, डॉ. स्वाती पवार, डॉ. श्याम बहाकर, मकसुद शेख, कानिफनाथ परदेशी, आशासेवक पुनम गाडे, अंजली गायकवाड, ग्रामसेविका पुनम शेवाळे, शिक्षिका पौर्णिमा अशोक कुसाळकर, रोहिणी मधुकर कुल्हे, भाऊराव पांडे, तलाठी विष्णु रुपनवर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा आरोग्य तपासणीचा उपक्रम घेण्यात आला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, सर्व कोरोना योद्धे, आणि पै. गणेशभाऊ बोत्रे युथ फौंडेशनचे ग्रामस्थांनी आभार मानले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.