आरोग्य

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेअंतर्गत आखरवाडी ग्रामस्थांची कोरोना तपासणी

 

कोविड १९ चे सुरक्षा कीटचे वाटप

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : आखरवाडी (ता. खेड) येथे (दि. १० ऑक्टोबर २०२०) रोजी कोविड १९ चे सुरक्षा कीट वाटप व “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

आखरवाडीत मास्क व सॅनिटायझरचे वाटप

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, शहराध्यक्ष सुभाष होले, राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक, कांचन ढमाले, अॅड. मनिषा पवळे, सुजाता पचपिंड, युवती अध्यक्षा तांबे, सरपंच बबन मुळूक, उपसरपंच संगीता मुळूक, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ मुळूक, अनिल मुळूक, चेतन मुळूक, बबन मुळूक, स्वप्निल मुळूक, पोलीस पाटील नवनाथ मुळूक, अतुल मुळूक, मनोज मुळूक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसेविका दौंडकर, वैशाली मुळूक, रोहिदास मांजरे, आरोग्य कर्मचारीं, आशा स्वंयसेविका यांच्यासह आरोग्य पथकाने घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. यावेळी कोरोना विषयक माहिती व कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी पाळावयाचे नियम तसेच घ्यावयाची काळजी याबाबत पथकाव्दारे माहिती सांगून जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर योग्य तो वैद्यकीय सल्ला व उपचारासंबंधी माहितीही यावेळी देण्यात आली.

तसेच ग्रामस्थांकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी अॅड. अरुण मुळूक यांच्या कडून आखरवाडीतील नागरिकांना घरोघरी जाऊन कोविड १९ चे सुरक्षा कीट (मास्क व सॅनिटायझर) चे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे आखरवाडी ग्रामस्थांनी कौतुक केले.

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

8 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.