महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : पुणे-नासिक महामार्गावरील वाकी (ता.खेड) येथील भामा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या माय-लेकीला स्वतःचा जीव धोक्यात घालून चाकण वाहतुक विभागाचे पोलिस शिपाई प्रविण गंगाराम भोमाळे यांनी स्वतः नदीपात्रात उडी मारून दोन तरुणांना सोबत घेऊन पोहत जाऊन दोघींनाही नदीपात्रातुन बाहेर काढले. मात्र यात आईचा मृत्यू झाला असून लेकीचे प्राण वाचले आहेत.
काल दि.१८ ऑक्टोबर रोजी दुपारी १:१५ वा.वाकी येथे ओहर स्पीड कारवाई करण्यासाठी चाकण वाहतुक विभागाचे पोलिस शिपाई प्रविण गंगाराम भोमाळे गेलेले असताना रस्त्यावरून जाणाऱ्या इसमाने गाडीजवळ येऊन सांगितले की, भाम ब्रिज पुल वाकी येथे दोन महिलांनी नदीपात्रात उडी मारली आहे.भोमाळे लगेच घटनास्थळी गेले आणि माहिती मिळाली त्याप्रमाणे खात्री केली असता, दोन महिला पाण्यात बुडत आहेत असे ठाणे अमंलदार पोलीस हवालदार डोईफोडे यांना कळविले.
त्यांनी कंट्रोल येथे कळवुन अग्निशमन दल यांना मदतीला बोलावण्यास सांगितले. परंतु भोमाळे व त्यांचे सहकारी यांनी मदतीची वाट न पाहता दोन्ही महिला यांना वाचविण्यासाठी भाम पुलाजवळ स.पो.फौ. रेंगडे, पो.शि. तळपे, पो.शि. भोमाळे चाकण वाहतुक विभाग हे पुलाजवळ असताना चाकण वाहतुक विभागाचे पोलिस शिपाई प्रविण भोमाळे यांनी स्वतः नदीपात्रात उडी मारून दोन तरूणांना सोबत घेऊन पोहत जाऊन माय लेकीला नदीपात्रातुन बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चाकण येथे रुग्णवाहिकेत पाठविले. या दोन महिलांपैकी आई मिरा राजेंद्र उबाळे (वय ५६ वर्षे) ही महिला मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले व त्यांची मुलगी पुनम राजेंद्र उबाळे (वय ३१ वर्षे) या महिलेला वाचविण्यात यश आले आहे. आमहत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.