वडगाव मावळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मावळ तालुक्यातील धरण परिसर व पर्यटन क्षेत्रात वर्षा विहार पर्यटनासाठी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला असून मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसीडन्ट कमांडंर संदेश शिर्के यांनी यासंदर्भात आदेश काढला आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मावळ तालुक्यातील पुढील पर्यटन स्थळांवर पर्यटनासाठी जान्यास बंदी घालण्यात आली आहे.
पर्यटन स्थळे : टाकवे बुद्रुक, फळणे, माऊ, वडेश्वर, नागाथली, वाहनगाव, कुसवली, बोरवली, डाहुली, सावळे, कुसूर, निळशी, खांड, राजमाची, फनसराई, उधेवाडी, जाभवली, भुशी धरण व परिसर, पवना धरण व परिसर, तुंगार्ली धरण व परिसर, राजमाची व मंकी पॉईंट खंडाळा, घुबड तलाव व डुक्स नोज कुरवंडे, घोराडेश्वर डोंगर, एकविरा मंदिर वेहेरगाव, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे किल्ले, आंबेगाव येथील धबधबा, दुधिवरे येथील प्रतिपंढपूर मंदिर, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट व शिवलिंग पॉईंट लोणावळा या गावांमध्ये कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व नागरिकांच्या सुरक्षेततेच्या दृष्टिकोनातून पुढील आदेश येईपर्यंत पर्यटनासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.