आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींची नवीन मुख प्रतिमा तयार करून घेण्यात आली. या लक्षवेधी वैभवी नवीन मुख प्रतिमेचे लोकार्पण आणि सहस्त्रकुंभ जलाभिषेक सोहळा माऊली मंदिरात हरिनाम गजरासह वेदमंत्र जयघोषात पार पडला. आळंदी येथील कार्तिकी यात्रेचे औचित्य साधत ज्ञानेश्वर माऊलींची नवीन चांदीची मुख प्रतिमा मुखवटा लक्षवेधी तयार करण्यात आला आहे.
या मुख प्रतिमेचे लोकार्पण ज्ञानेश्वर महाराज मंदिरात करण्यात आले. यावेळी सहस्त्र जलकुंभाचे पूजन करून या जलकुंभातील जलाने नवीन चांदीच्या माऊलींच्या मुखवट्यास जलाभिषेक करण्यात आला. या जल कुंभांमध्ये इंद्रायणी, गंगा, नर्मदा या नद्यांचे जल आणण्यात आले होते. या मुखवटा अर्पण सोहळ्यास ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, व्यवस्थापक माऊली वीर, श्रींचे पुजारी प्रफुल्ल प्रसादे, ज्ञानेश्वर महाराजांचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरू, निलेश महाराज लोंढे आदी उपस्थित होते. कलबुर्गी येथील शिल्पकारांनी हा नवीन मुखवटा लक्षवेधी साकारला आहे.
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.