महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सेवक
चोपदार, आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे शाळा क्रमांक १ मधील सेवानिवृत्त शिक्षक, पालखी सोहळ्यात प्रदीर्घ काळ सेवारत असताना वार्तांकन करणारे जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव रंधवे ( चोपदार गुरुजी, वय ८३ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी ( दि १६ ) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सेवारत परिवार आहे.
माऊलीचे पालखी सोहळ्यात त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली. माऊली मंदिरात चोपदार गुरुजी यांनी सेवा करीत विविध संस्थाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. मराठा सेवा संघाचे माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
‘आम्ही वारकरी’संस्थेचे प्रमुख राजाभाऊ चोपदार, बांधकाम व्यावसायिक रामभाऊ चोपदार, शिवस्फुर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. शैलजा मोळक ( चोपदार ), पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या सहाय्यक शिक्षण विभाग प्रमुख शिल्पकला रंधवे यांचे ते वडील, तर पुणे महापालिकाचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांचे ते सासरे होत. श्रीचे सेवक चोपदार गुरुजी यांचे पार्थिवावर येरवडा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तीर्थक्षेत्र आळंदी व वारकरी संप्रदायात गुरुजींच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.