महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील आदर्शमाता गं भा. कमळाबाई कृष्णाजी पवार ( वय ८५ ) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेनुसार, पवार कुटुंबाने या मातेच्या आस्थी विसर्जन विधी नदीपात्रात किंवा पाण्यामध्ये न टाकता शेतामध्ये खड्डा खोदून त्यात एक आंब्याचे स्मृतीवृक्ष लावून त्या मातेच्या आठवणी जतन केल्या.
महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश खराबी, प्रवक्ते हनुमंत देवकर व प्रतिष्ठानचे सल्लागार कीर्तनकार हभप. भरतमहाराज थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्मृती वृक्षाची लागवड करून एक पर्यावरण पूरक आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांचे चाकण पंचक्रोशी मध्ये अभिनंदन केले जात आहे. हाच आदर्श सर्वांनी घेऊन निसर्ग संवर्धनाचे काम करावे, असे महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या वतीने या आदर्श मातेस भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली.
यावेळी त्यांची मुले हभप. शंकर पवार, हभप. विजय पवार, राजेंद्र पवार, बाळासाहेब पवार, मुलगी बेबी तिडके, मधुकर कड, दत्तात्रय कड, कांताराम कड, यशवंत कड, रघुनाथ खराबी, विजय काका तडपते, कैलास येळवंडे, निघोजे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समाधान येळवंडे, समाजभुषण सुदाम येळवंडे, उद्योजक केतन आल्हाट, हभप. अशोक येळवंडे, त्यांचे नातू, सुना आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.