अहमदनगर : गावामध्ये सामुहिक कापलेल्या बोकडाचा वाटा करण्यावरून झालेल्या वादात दोन गट एकमेकांवर भिडले. दोन्ही गटामध्ये काठ्या, कुर्हाडी, दगडाने झालेल्या हाणामार्यात आठ जण जखमी झाले आहेत. नगर तालुक्यातील बाळेवाडी गावामध्ये ही घटना घडली. दोन्ही गटाने नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मंगल बाबासाहेब पालवे (वय 35 रा. बाळेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल पोपट पालवे, गणेश पोपट पालवे, पोपट दत्तू पालवे, राजेंद्र दत्तू पालवे, प्रकाश दादाबा पालवे, रोहीत राजेंद्र पालेव, सिमा गणेश पालवे (सर्व रा. बाळेवाडी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसर्या गटाच्या सिमा गणेश पालवे (वय 25) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत ऊर्फ दाद्या बाळासाहेब सानप, परमेश्वर ऊर्फ भमड्या बाबासाहेब पालवे, बाबासाहेब मोहन पालवे, धनेश्वर बाबासाहेब पालवे, मंखाबाई बाबासाहेब पालवे, बाळासाहेब गंगाधर सानप, कचरू शहादेव घुले, नवनाथ गहिनाथ घुले, (सर्व रा. बाळेवाडी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही गटातील 10 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत व उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.