महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण नाही, देशातील महिला
सुरक्षित नाहीत, मराठा बांधव तसेच शेतकऱ्यांची लेकरे नोकऱ्यांसाठी संघर्ष करत आहेत. सरकारने मराठा समाजाच्या हक्काच्या मागण्या मान्य करून वेळीच मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती दिल्यानंतर आजपर्यंत राज्यभरात मोठ्या प्रमाणात मराठा आक्रोश मोर्चे निघाले. तसेच आजपासून ( दि. ५ ऑक्टोबर ) शासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानुसार आज राजगुरुनगर येथील तहसीलदार कार्यालयासमोर हरिनामाचा गजर करत मराठ्यांच्या आरक्षणाबाबत धरणे आंदोलन करण्यात आले. या दरम्यान पाऊस असून देखील विविध प्रकारच्या मागण्यांसाठी तरुणांबरोबरच महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलनात दिसत होता.
या आंदोलनाचे नेतृत्व मनोहर वाडेकर, वामन बाजारे, माजी सभापती अंकुश राक्षे, सभापती भगवान पोखरकर, शंकर राक्षे, उपसभापती ज्योती आरगडे, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, मनसे नेते समीर थिगळे, सुदाम कराळे, विठ्ठल पाचारणे, मनीषा टाकळकर, अनिल राक्षे, क्रांती कराळे, चेतन शेटे, भरत पवळे, अशोक मांडेकर, अमोल पानसरे, दत्ता मांडेकर, सौरव दौंडकर, अनिल बारणे, कालिदास बोत्रे, राहुल पिंगळे, शुभम गाडगे, रुपाली राक्षे आदी कार्यकर्त्यांनी केले.
दुपारी तीनच्या सुमारास नायब तहसीलदार धोत्रे मॅडम यांनी आंदोलन कर्त्यांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारून आंदोलन मागे घेण्यात आले.
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.