गुन्हेगारी

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या विकृतीला ठेचून काढण्याची गरज : प्रवीण दरेकर

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
शिंद-वासुली : “खेड तालुक्यात १७ वर्षाच्या मुलीची विवस्त्र करुन हत्या केली जाते आणि गाव, समाज मयतीलाही न येणे ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना असून समाजातील अशा प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज आहे”, असे मत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
खेड तालुक्यातील करंजविहीरेच्या थोपटवाडीतील आरती सोपान कलवडे ( वय १७ ) या कोवळ्या तरुण मुलीची शुक्रवारी (२४ जूलै ) दुपारच्या सुमारास निर्घून हत्त्या झाली होती. कलवडे कुटूंबाचे सांत्वन व घटनास्थळाला भेट देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “ही घटना घडली तेव्हा राज्याचे गृहमंत्री पुण्यात असताना गांभीर्याने दखल घेतली नाही, पिडीत कुटूंबाची भेट घेतली नाही, म्हणजे हे सरकार किती असंवेदनशील आहे. दिवसेंदिवस महिला मुलींचा विनयभंग व  आत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महिला अत्याचारांच्या घटनांकडे सरकारचे दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. परंतु आम्ही थोपटवाडीच्या कलवडे कुटूंबाला न्याय मिळे पर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करुन यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी”.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हत्या झालेल्या ठिकाणची पहाणी करुन कलवडे कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी मुलीच्या आई वडीलांनी आम्हाला गावकी, भावकीने वाळीत टाकले असून दोन वर्षांपूर्वी घडलेल्या छेडछाडीच्या घटनेची खुन्नस काढण्यासाठी आमच्या मुलीचा खून केला असल्याचे सांगितले. पाटील, सरपंच त्यांचेच व त्यांना राजकीय वरदहस्त असल्याने आम्हाला न्याय मिळण्याची खात्री नसल्याची त्यांनी कैफियत मांडली. दरेकरांनी कलवडे कुटूंबाचे सांत्वन करुन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास दिला.
यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, माजी तालुकाध्यक्ष दिलीप वाळके, तालुका उपाध्यक्ष सुनिल देवकर, संजय रौंधळ, शिवाजी डावरे, रामदास कोळेकर, बाबाजी सोंडेकर, अरुण गाडे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

8 hours ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

1 day ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

2 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.