महाबुलेटीन न्यूज
चाकण : मंथन फाउंडेशन , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १५ मे ते २१ मे २०२१ असे सात दिवसीय योगाभ्यास शिबिरांचे ऑनलाईन पद्धतीने नियोजन केले आहे.
मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट म्हणाल्या की, “शिबिरामध्ये योगामधील आसन, प्राणायाम आणि शुद्धिक्रिया, अंतरंग योग यांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्याचे प्रयोजन केले आहे.”
निरामयच्या तज्ञ योग शिक्षक व डॉक्टर शिक्षकांनी हा अभ्यासक्रम बनवलेला आहे. या अभ्यासक्रमामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढवणे, फुफुसांची क्षमता वाढविणे श्वास विकार, दमा अस्थमा कमी होतो, थायरॉईड साठी उपयुक्त वात व कफदोष कमी होतात, मनावर येणारा ताण तणाव कमी होतो, श्वसनसंस्थेचे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. श्वसन मार्गाची शुद्धी होते. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशात आपण अभ्यासक्रम पोहोचला आहे. त्याचे उत्कृष्ट रिझल्ट मिळाले आहेत.
शिबिरास व्यवस्थापक व मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट, योगाच्या केंद्रप्रमुख योग शिक्षक विद्या आहेरकर, प्रा. राम काकडे, डॉ. नीता पद्मावत, डॉ. सतीश बापट, डॉ. मीनाक्षी रेड्डी, डॉ. अर्चना मुदखेडकर, सविता स्वामी, रविना कुलकर्णी, आरती मानुरकर, शीतल शेंडगावकर, पल्लवी आदींचे सहकार्य लाभले. या शिबिराचा लाभ घेऊन आपली प्रतिकारक शक्ती वाढवा, असे आवाहन आशा भट्ट ( 7350016571 ) यांनी केले आहे.
०००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.