महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंदिरे भाविकांना बंद केली. मात्र आत्ता मॉल, मांस, दारु विक्री सुरू करून राज्यातील तिजोरीवरचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. मदिरेची दुकाने सुरू असताना राज्यात मात्र भाविकांच्या देवदर्शनासाठीची मंदिरे बंद आहेत. यामुळे राज्यातील शासनाने इतर राज्यातील आदर्श डोळ्या समोर ठेवून मंदिरे पुन्हा भाविकांना देव दर्शनास सुरू करावीत. या मागणीस पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्षा गणेश भेगडे यांचे नेतृत्वात माऊली मंदिरा समोर जोरदार घोषणा बाजी करीत राज्यातील मंदिरे खुली करण्यास राज्य शासनास सद्धबुद्धी देवो असे माऊलीना साकडे घालत मागणी करून मंदीरा समोर घंटानाद आंदोलन केले.
यावेळी आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, गटनेते पांडुरंग वहीले, सागर भोसले, नगरसेविका श्रीमती रुक्मिणी कांबळे, विशेष जिल्हा निमंत्रीत सदस्य पांडुरंग ठाकूर, संजय घुंडरे, माजी नगरसेवक रामभाऊ भोसले, अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, संतोष गावडे, गणेश राहणे, भागवत आवटे, बंडुनाना काळे, अॅड.आकाश जोशी, अॅड.सचिन काळे, माऊली बनसोडे, प्रमोद बाफना, हभप पांडुरंग महाराज शितोळे, सदाशिव साखरे, भागवत काटकर, महेश गायकवाड, चारुदत्त प्रसादे, तसेच भाजपचे कार्यकर्ते तसेच आळंदीतील नामवंत महाराज, वारकरी, नागरिक उपस्थित होते. यावेळी आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र चौधर, गुप्तवार्ता विभागाचे मच्छिंद्र शेंडे यांचे माध्यमातून प्रभावी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील देवस्थाने,गावागावातील धार्मिक स्थळे ग्रामस्थ, भाविकांना देवदर्शनास खुली करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. याचे औचित्य साधून भाजपने राज्यात पुढाकार घेवून घंटानाद आंदोलन जाहीर केले. त्यास सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारनेही ४ जून २०२० जाहीर केल्या नुसार देशातील राज्य सरकारांनी मंदिरे सुरू देखील केली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक प्रार्थना स्थळे सुरू करण्यासह राज्यात भजन, कीर्तन आणि पूजन करण्याची मागणी भाविक भक्तांतून होते असल्याने राज्य शासनाने तात्काळ मंदिरे खुली करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र ठाकरे सरकार मदिरेची दुकाने सुरू करून मंदिरे सुरू करण्याचे मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता भाजपने घंटानाद आंदोलन केले आहे. जर मंदिरे सुरू नाही झाली, तर अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ठाकरे सरकार विरोधात घोषनाबाजी करून आळंदी मंदिरा समोर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विविधा मान्यवरांनी मार्गदर्शन करीत मंदिरे सुरू करण्याची मागणी करीत आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी आळंदी देवस्थांचे व्यवस्थापक माऊली वीर यांनाही भाजपचे वतीने निवेदन देवून मंदिर सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मंदिरे बंद करून श्री हरीला बंदिस्त ठेवले असून सर्व मंदिरे सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संत भूमी महाराष्ट्रात मदिरा विक्रीस मात्र परवानगी देवून भजन, पूजन, देवदर्शन बंद करीत भक्तांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, यातून जनतेने शासनाचे भूमिकेचा बोध घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
——
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.