महाबुलेटीन न्यूज
इंदापूर ( प्रतिनिधी ) : मंदिरे उघडण्यासाठी भाजपने राज्यभरात पुकारलेल्या घंटानाद आंदोलनास इंदापूरात प्रतिसाद मिळाला तालुक्यातील श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असणा-या पुरातन नृसिंह मंदीरात माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान ‘उद्धवा दार उघड’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली आहे. तिरुपती बालाजी या देवस्थानासह देशातील मंदिरे व धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहेत. राज्यात इतर सर्व व्यवहार सुरु आहेत. फक्त मंदिराचे दरवाजे राज्य शासनाने बंद केले आहेत. मार्च महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. मंदिरे असलेल्या गावातील हजारो लोकांची उपजीविका धोक्यात आली आहे. त्यामुळे शासनाने नियम व अटी घालून मंदिरे, धार्मिक स्थळे जनतेसाठी खुली करावीत. तातडीने हा निर्णय घेण्यात आला नाही तर भाजपाचे कार्यकर्ते तो घेण्यास भाग पाडतील’ असा इशारा पाटील यांनी दिला.
इंदापूर तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास तालुक्याचे निष्क्रीय लोकप्रतिनिधी, राज्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केला. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यमंत्र्याकडे नियोजनाचा अभाव आहे. कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार,तानाजी थोरात, मारुती वणवे,ह.भ.प.अंकुश रणखांबे,सचिन सावंत यांची या वेळी भाषणे झाली. नीरा-भीमा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,मयूरसिंह पाटील,युवराज म्हस्के,महेंद्र रेडके,महादेव घाडगे,किरण पाटील, मनोज पाटील,राम आसबे,हरिभाऊ घोगरे, बाळासाहेब मोहिते,नाथाजी मोहिते,आण्णा काळे,राजेंद्र मोहिते,हनुमंत काळे,संतोष मोरे, विलास ताटे,किशोर मोहिते,पवन घोगरे,सुभाष काळे,शंकर घोगरे,प्रदीप बोडके,अभय वांकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ व धार्मिक क्षेत्रातील मंडळींनी आंदोलनात सहभाग घेतला.
—–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.