महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खेड पंचायत समितीचे मा. उपसभापती व विद्यमान सदस्य, काँग्रेसचे नेते अमोल पवार ह्यांची कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या आई-वडिलांची कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे. कुटुंबातील बाकीच्या सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून पवार व त्यांच्या आई वडिलांना सध्या कसलाही त्रास होत नाही. परंतु आई-वडीलांचे वय पाहता ते सर्व खाजगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांत त्यांनी काही जवळचे दशक्रिया विधी व सार्वजनिक कार्यक्रम केले होते. तसेच महाळुंगे कोविड सेंटरला वरच्यावर भेट देत होते.
मागील काही दिवसांत त्यांनी कोरोना योद्धा म्हणून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आपल्या मतदार संघात गरजू लोकांना अन्नधान्य, किराणा किट, सॅनिटायझर, मास्क वाटप तसेच वाढदिवसानिमित्त नागरिकांना आर्सेनिक आल्बम गोळ्यांचे वाटप, कोविड सेंटरला मिनरल वॉटर आदी सामाजिक उपक्रम त्यांनी मित्र परिवार सोबत राबविले असताना त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता.
माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व मित्र परिवाराने आपल्या टेस्ट करून घ्याव्यात तसेच सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.