नारी शक्ती

महिलांनी आत्मविश्वासाचा वापर करून वेगळी ओळख निर्माण करावी : अश्विनी कुलकर्णी

 

महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी बँक ऑफ बडोदा सढळ हाताने अर्थसाहाय्य करेल, अशी ग्वाही बँक ऑफ बडोदा आरसेटीच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी यांनी दिली. मेधावीन फाउंडेशन व बँक ऑफ बडोदा आरसेटीच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षणाच्या प्रशस्ती पत्रक वितरण समारंभाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिलांकडे असलेला आत्मविश्वास आणि कौशल्य याचा वापर स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित करण्यासाठी करावा. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश निरीक्षक भारती शेवाळे, कुलस्वामीनी महिला मंचच्या संस्थापिका सारिका सुनील शेळके, उद्योजिका स्वाती पवार, नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, बँकेचे शाखा व्यवस्थापक अमित कुमार, बँकेचे अधिकारी शाम कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रदेश निरीक्षक भारती शेवाळे म्हणाल्या की, आरक्षणामुळे मिळालेले पद त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजून घेऊन आपले काम चोख करावे. महिलांनी जिद्द ठेऊन हाती घेतलेला उद्योग यशस्वी करून दाखवावा, असे सारिका शेळके म्हणाल्या. या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रशस्ती पत्रकाचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षणाचे नियोजन बँक ऑफ बडोदा आरसेटीचे मंगेश माने व सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केले. प्रास्ताविक फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती शिंदे व स्वाती दाभाडे यांनी केले . निशा पवार यांनी आभार मानले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 26 Sep 2026

गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नवीन…

19 hours ago

MahaBulletin — 24 Sep 2026

बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पीडीसीसी…

3 days ago

MahaBulletin — 23 Sep 2026

मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 थार…

4 days ago

MahaBulletin — 22 Sep 2026

सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मामा-भाच्याची…

5 days ago

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

6 days ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

7 days ago

This website uses cookies.