महाळुंगे पोलीस ठाण्यात महिलांचा सन्मान
महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे : “महिला सक्षमीकरणापेक्षा आपण महिला मुक्तीला जास्त महत्व दिले पाहिजे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे विश्व निर्माण करावे,” असे प्रतिपादन महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला दक्षता समितीच्या सदस्या, महिला पोलीस पाटील आणि महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “२०१२ साली दिल्लीत निर्भया प्रकरण झाल्यानंतर कायदयात मोठे बदल करण्यात आले असून देशात महिलांच्या तक्रारींना प्राधान्य दिले जात आहे. पालक अल्पवयात मुलांना सर्रास मोबाईल देतात ते देऊ नयेत. खरंतर मुलांना दहावी-बारावी नंतर मोबाईल दिले पाहिजेत. आपला मुलगा-मुलगी यांना आपण घरात कितीही संस्कार दिले तरी ते समाजात गेल्यांनतर वाईट संगतीमुळे बिघडू शकतात. त्यामुळे त्यांचेकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. मात्र मुलींकडे अधिकचे लक्ष देत असताना मुलांकडे दुर्लक्ष्य करू नये, त्यासाठी आम्ही परिसरातील शाळांना भेटी देणार आहोत. तसेच काही घटना घडल्यास महिलांनी ११२ नंबरवर कळवावे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पोलीस पाटील तृप्ती मांडेकर म्हणाल्या, “महिलांनी परिवर्तनातून विकास करावा. गावोगावी दक्षता समितीच्या महिला पोलीस पाटलांना मदत करतात. महिलांनी गावात काम करताना आपल्या पदाला न्याय द्यावा. चाकण औद्योगिकरणामुळे भाडेकरू वर्ग वाढला असून त्यात परप्रांतीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. पळून जाणाऱ्या महिला व मुलींचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी गावातील सीसीटीव्ही कॅमेरे कायम चालू ठेवावेत. पोलिसांनी परिसरातील शाळांना कौन्सिलिंग करावे. मुलींना गुड टच व बॅड टच याबाबत ज्ञान द्यावे.”
यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे, महिला पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षा तृप्तीताई मांडेकर, महिला दक्षता समितीच्या सदस्या बेबीताई कड, सरिता वाघमारे, महिला पोलीस काळे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व महिलांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला दक्षता समिती सदस्या व महिला अत्याचार तक्रार समितीच्या केंद्रीय सदस्या मंगलताई देवकर, रत्नाताई पिंगळे, सीमाताई साठे, गीताबाई मांडेकर, सर्व सदस्या, महिला पोलीस पाटील व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांनी सूत्रसंचालन केले. तर गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी संपत मुळे यांनी आभार मानले.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.