महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जंयतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले.
महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ ची घोषणा देऊन या देशातील सैनिकांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला. या दोन महान नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व राष्ट्रउभारणीतील कार्याचे स्मरण करून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता पुणे रेल्वेस्टेशन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी प्रशासनातील अधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन केले
—
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.