महाबुलेटीन न्यूज : प्रसन्नकुमार देवकर
पुणे : “समाजातील भेदभाव करण्याच्या वृत्तीमुळे आजही तृतीय पंथीयांना समान अधिकार मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे ही शोकांतिका आहे. वाय आर जी केयरच्या ट्रान्सजेन्डर क्लिनिकमुळे आता स्वतंत्र उपचार मिळणे शक्य होईल. तसेच आरोग्यातील सर्व स्तरात रुग्यसेवेत तृतीय पंथीयांना स्वतंत्र अधिकार द्यावेत”, असे प्रतिपादन जॉन्स हापकीन युनिव्हर्सिटीच्या ट्रान्स हेल्थच्या संचालिका सिमरन बरूचा यांनी केले. वाय आर जी केयर पुणेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील तृतीय पंथीयांसाठी ट्रान्स क्लिनिकची सुरुवात करण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या.
एक्सलरेट प्रकल्पाच्या माध्यमातून यु एस एड आणि पेपफार यांच्या वतीने तृतीय पंथीयांसाठी व्यापक आणि एकात्मिक सेवांच्या आदर्श प्रतिमा टी. जी. क्लिनिकच्या माध्यमातून सेवेत येत आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कक्ष, एलजीबीटी सीबीओ आणि मंथन फाउंडेशन व तृतीय पंथी समुदाय यांचे सहकार्य याला लाभले आहे. पुण्यात डीम्ड युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या भागीदारीत अॅक्सेलेरेट क्लिनिकच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर समुदायाला एकात्मिक सेवांचे पॅकेज प्रदान करण्यात येईल.
या प्रसंगी तृतीयपंथी चळवळीतील सोनल दळवी, चांदणी गोरे, शंकरी, वाय आर जी केयर पुणे जिल्हा सन्वयक दीपक निकम, मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, जगदीश पाटील, सचिन नारखेडे, अमर चव्हाण, मुग्धा चिटणीस, हर्षा जाधव, वंदना सूर्यवंशी, आशिष चौधरी, अनिल उकरंडे, लतिका कर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. तांत्रिक तज्ञ शंकरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रकल्प-क्षेत्र समन्वयक रंगनाथ जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर वाय आर जी केयर पुणेचे जिल्हा सन्वयक दीपक निकम यांनी आभार मानले.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.