पुणे जिल्हा

● चाकणला आता महानगरपालिका करणार, अजितदादांनी दिल्या पीएमआरडीएचे सुहास दिवसे यांना सूचना : आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांची माहिती ● औद्योगिक भूखंड ५ वर्षे वापरला नाही तर तो परत देण्याचा कायदा : आमदार मोहिते पाटील ● कामगार संघटना व माथाडीच्या नावाखाली कंपनी मालकांनी पोसल्या टोळ्या, माथाडी कायदा रद्द करावा : आमदार मोहिते पाटील ● घरच्या भेदींना शोधून काढू व त्यांच्यावर कारवाई करू : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ● चाकण एमआयडीसीतील म्हाळुंगे पोलीस चौकीत पोलीस अधिकारी, अंमलदार कक्ष, महिला कक्ष व जिमचे उदघाटन

● चाकणला आता महानगरपालिका करणार, अजितदादांनी दिल्या पीएमआरडीएचे सुहास दिवसे यांना सूचना : आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांची माहिती
● औद्योगिक भूखंड ५ वर्षे वापरला नाही तर तो परत देण्याचा कायदा : आमदार मोहिते पाटील
● कामगार संघटना व माथाडीच्या नावाखाली कंपनी मालकांनी पोसल्या टोळ्या, माथाडी कायदा रद्द करावा : आमदार मोहिते पाटील
● घरच्या भेदींना शोधून काढू व त्यांच्यावर कारवाई करू : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
● चाकण एमआयडीसीतील म्हाळुंगे पोलीस चौकीत पोलीस अधिकारी, अंमलदार कक्ष, महिला कक्ष व जिमचे उदघाटन

महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण एमआयडीसी : “खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी व कडाचीवाडी या चारही वाड्यांची लोकसंख्या लाखाच्या आसपास आहे. या ठिकाणी महानगरपालिका करायची आहे, त्यासाठी पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पीएमआरडीएचे सुहास दिवसे यांना सूचना केल्या आहेत. त्याचं आम्ही प्लॅंनिंग करतोय.” चाकण एमआयडीसीतील म्हाळुंगे पोलीस चौकीत पोलीस अधिकारी कक्ष, अंमलदार कक्ष, महिला कक्ष व जिमचे उदघाटन आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील व पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

आमदार मोहिते पुढे म्हणाले, “एमआयडीसीचा तसेच औद्योगिक क्षेत्रातील भूखंड घेतल्यानंतर ५ वर्षे वापरला नाही, तर तो परत घेण्याचा आम्ही कायदा केला आहे.”

यावेळी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, “चाकण एमआयडीसीत जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. जगातील अनेक देशातील उद्योजक येथे इंडस्ट्री चालवतात. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या पोलीस चौकीची पाहणी केली होती. पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी येथे पोलीस चौकी करण्याचा निर्णय घेतला, त्याला मी विरोधही केला होता. कारण खराबवाडी हे गाव चाकणच्या जवळ आहे व ते चाकणचा एक भाग आहे. हे गाव चाकण पोलीस ठाण्यात पाहिजे असताना म्हाळुंगे मध्ये घेतले. मोई व कुरुळी या गावांना चाकण सोयीस्कर असताना तेही या चौकीमध्ये समाविष्ट केले. त्यासाठी प्लॅन तयार करा, काही ग्रामीण भागाचे विभाजन करता आले पाहिजे, त्यासाठी अजून एखादे पोलीस स्टेशन असावे. मोई व चिंबळी चाकणला पोलीस ठाण्याला जोडायला पाहिजे, त्यांना चाकण सोयीस्कर आहे.”

ते पुढे म्हणाले, “या भागात कायदा सुव्यवस्था राखली जावी. कामगार संघटना ( युनियन ).व माथाडी होऊ नये, म्हणून कंपनी मालकांनी गुन्हेगारी टोळ्या करू नये. याला मालक लोक जबाबदार आहेत. कंपन्यांमध्ये माथाडीने शिरकाव केला, माथाडीच्या नावाखाली फुकटचे पैसे न देता माथाडी कायदा रद्द करावा. कामगारांना संरक्षण मिळालं पाहिजे, कंपन्यांनी टोळ्या निर्माण करू नये. कंपनी व्यवस्थापक, अधिकारी स्क्रॅप ठेके घेण्यासाठी भागीदारी घेतात. काही स्क्रॅप उचलणारे ब्लॅक लिस्ट मध्ये गेल्याने ते नाव बदलून स्क्रॅप ठेके घेतात. त्यांना पोलिसही सहकार्य करतात, यासाठी सीपींनी वेषांतर करून अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. मी कधीही चुकीच्या कामांचे समर्थन करत नाही. मला एजंट व्हायला आवडत नाही. भीती आणि भय याला मी घाबरत नाही. मात्र गुन्हेगार नसणाऱ्या व्यक्तींवर अन्याय होता कामा नये.”

यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्मार्ट पोलीस चौकी बनविल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे कौतुक केले. व म्हणाले, “या परिसराचा भौगोलिक अभ्यास करून, आमदारांशी चर्चा करून जवळची गावे चाकणला जोडण्यासाठी प्रयत्न करू. आणखी एखादे पोलीस स्टेशन करू. पोलिसांनी संवेदनशील व्हावे. एमआयडीसी मार्फत जे काही केलं ते सर्व तुमच्यासाठीच आहे. सर्वांनी एकत्र बसून ज्ञान आणि संकल्प करावा. ग्रामसुरक्षा दल, पोलीस पाटील यांचे कौतुक केले. इथं पोलीस चौकीच राहील, पोलीस स्टेशन दुसऱ्या ठिकाणी होईल, असे त्यांनी आश्वासन दिले. यासाठी ग्रामस्थ व इंडस्ट्रीचे मोठे योगदान लाभले आहे.

ते पुढे म्हणाले, “घरच्या भेदींना शोधून काढू, आम्ही त्यांच्यावर कारवाई करायला तयार आहे. माथाडी फुकट वेतन करू नये, स्क्रॅपचा व्यवसाय कंपनीचे मालक व त्यांचे पदाधिकारी जर भागीदारीने करीत असेल तर त्यांच्या चुकीला माफी नाही, तुम्ही आम्हाला कळवा, तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल.”

● मागील २० वर्षात या भागाचा झपाट्याने विकास झाला, गुन्हेगारी वाढली असता कमी करण्याचे आमच्यापुढे आव्हान होते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भयमुक्त वातावरण करण्याचे आश्वासन दिले. आणि आम्ही खंडणीखोर ५०० पेक्षा जास्त लुटारूंना जेरबंद केले. यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलीस पाटलांच्या माध्यमातून गावातील मुलांसाठी प्रेरणादायी वर्ग संस्कार वर्ग घ्यावेत, अभ्यासिका, व्यायामशाळा, मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. स्मार्ट पोलिसिंग बनवताना सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभले. त्यासाठी चाकण परिसरातील औद्योगिक कंपन्यांचा हातभार लागला. महिंद्रा कंपनीचे विजय नायर साहेव यांना कॉल केला, अन अर्ध्या तासात कामाला सुरुवात केली. सर्व प्रकारचे कक्ष केले, सिपी साहेबांच्याच्या माध्यमातून जिम बनवली.
— वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार
—————-

● यावेळी पोलीस चौकीचा परिसर सुधारणा व विविध कक्षांचे बांधकामासाठी योगदान देणाऱ्या औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी व परिसरातील पुढील दानशूर व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अरेमंड कंपनी, प्लॅस्टिक कँपनी
जॉन डीसा, प्रमोद त्रिपाठी महिंद्रा कंपनी
स्कॅन कंपनीचे किशोर दरेकर
रोहित लामखडे महिंद्रा सीएई
मदरसन कंपनी विशाल कबाडी,
निलेश पवार शुभ लाभ ग्रुप
आशिष येळवंडे
सुरेश पिंगळे
सोमनाथ तरस
सचिन देठे मिंडा कार्पोरेशन भांबोली,
योगेश वाके, सुर्या ग्रुप
ऍड सोमनाथ दौंडकर, अरुण घिया
एकनाथ कर्पे क्रशर असो अध्यक्ष मोई
अजित प्रकाश येळवंडे
मनोज यादव, मौर्य हॉस्पिटॅलिटी
विजय खराबी खराबवाडी
राजेंद्र भोसले, माजी सभापती चंद्रकांत इंगवले, योगेश तुपे
प्रज्योत घाडगे
मनसे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी

● औद्योगिक झोनमध्ये वेगवेगळी आव्हाने व समस्या असतात. चाकण हे भारताचे ऑटो हब असून त्याची तुलना अमेरिकेतील डेट्रॉईट शहराशी केली जाते. औद्योगिक क्षेत्रात भयमुक्त वातावरण झाले असून उद्योगांमध्ये जास्त गुंतवणूक झाली पाहिजे. आपल्या भागात इंडस्ट्रीज असेल तर सर्वांना रोजगार मिळेल. खंडणीखोर गुन्हेगारांवर कारवाई केल्याने लोकांना आता भीती राहिली नाही.
— परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त इप्पर मंचक
———————–

● म्हाळुंगे गावचे पोलीस पाटील सचिन भोपे यांनी सुरुवातीपासून या चौकीला सहकार्य केले. पीआय अरविंद पवार साहेब यांनी तळागाळातील जनतेचा विचार करून येथे काम केले आहे. चौकीत वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी केली. चाकण पोलीस ठाण्यात पीआय अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर घेतले. बाललैंगिक अत्याचार प्रश्न हाताळणाऱ्या सांगूर्डीच्या पोलीस पाटील सोनम काळे यांचेही त्यांनी कौतुक केले.
— तृप्ती मांडेकर पोलीस पाटील
—————————————

● पोलीस पाटील साहेबराव राऊत यांनी पोलीस पाटलांना कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी करून स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवान्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली.

● १७ पोलीस पाटलांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान :-
यावेळी पोलीस पाटील सचिन भोपे, गुलाब मिंडे, राहुल साकोरे, साहेबराव राऊत, प्रदीप गायकवाड, रवींद्र तुळवे, राजेश येवले, गावातील एकही तक्रार नाही, नारायण बिडकर, राहुल फडके, किरण किर्ते, तृप्ती मांडेकर, प्रतिभा कांबळे, सोनम काळे, आदी १७ पोलीस पाटलांनी कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आमदार दिलीप मोहिते पाटील व पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
—————————-

● मराठा मोर्चाच्या गुन्ह्यात मला एक वर्षाने गोवले गेले. पोलिसांनी राजकीय दबावाखाली काम करून एखाद्याचे आयुष्य बरबाद करू नये. काहींनी या परिसरात लोकांच्या जमिनी लुबाडल्या, एफएसआय लुटला. अशा जमिनी हडप करणाऱ्यांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये. जातीचा आधार घेऊन जागा हडप करून अन्याय करणारेही इथे आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्या पोलीस ठाण्याच्या समस्या डिजी साहेब व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून सोडवू. ट्राफिक सुरळीत करण्यासाठी कुरुळीत, खराबवाडीत सिग्नल बसवावेत. ज्या चौकांमध्ये महिलांची प्रवासासाठी जास्त गर्दी असते, अशा ठिकाणी स्वच्छता गृहांची गरज आहे.
— आमदार दिलीप मोहिते पाटील
———–

यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे आदी अधिकारी उपस्थित होते. अक्षय मोरे यांनी सुत्रसंचालन केले, तर गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी आभार मानले.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

1 day ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

1 day ago

MahaBulletin — 14 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 13 Apr 2026

रविवार, १२ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

6 days ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भेसळयुक्त…

1 week ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मँगो…

1 week ago

This website uses cookies.