निवडणूक

Mahabulletin News : मावळमधून लोकसभेसाठी संजोग वाघेरे!

महाबुलेटीन न्यूज : Mahabulletin News
पिंपरी : पिंपरीचे माजी महापौर आणि शिवसेनेचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी दिल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी ४ मार्च रोजी केली. ठाकरे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौर्‍यावर आहेत. घाटमाथ्याखाली पनवेल परीसरात त्यांच्या आज तीन जाहीरसभा आहेत. या सभांदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना होण्याची शक्यता आहे.

आपल्या दौर्‍यादरम्यान ठाकरे यांनी सध्याचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर कठोर टीका करत वाघेरे यांना विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

ठाकरे म्हणाले की, गद्दारी करणार्‍या इथल्या खासदाराला आडवा करायचाच पण सरकार ज्याचे येईल त्याच्याकडे जाणारे जे शेठ आहेत त्यांचीही दुकाने बंद करायची आहेत. ‘अबकी बार भाजप तडीपार’ हे आपल्याला करायचे आहे, किंबहुना ते करुच! भाजप इतका खोटारडा पक्ष या देशाच्या राजकारणात याआधी अस्तित्वात नव्हता. याठिकाणी ग्रामीण रूग्णालये नाहीत असे मला संजोग वाघेरे यांनी सांगितले. त्यामुळे मला लाज वाटते की हा गद्दार कोणे एकेकाळी शिवसेनेने निवडून दिला होता. परंतु त्याला ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न सोडवता आला नाही.

यावेळी बोलताना संजोग वाघेरे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांनी विकासकामांचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी एकही काम याठिकाणी केलेलं नाही. पाण्याची समस्या आहेच, परंतु याठिकाणी एकही आरोग्य केंद्र, रूग्णालय नाही. पनवेल शहरात समाविष्ट झालेल्या गावांमध्ये कराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. असे अनेक प्रश्न या शहरात सध्या निर्माण झाले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यात तयार आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात संघटन म्हणून पुढील काळात काम करणार आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या विचाराचा उमेदवार निवडून येईल, असं संजोग वाघेरे म्हणाले.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.