आर्टिकल

महाबुलेटीन नवरात्री विशेष : कोरोना महामारीच्या काळात जन सेवेसाठी ‘ती’ उतरली रस्त्यावर…

 

उच्चशिक्षित होऊन देखील वडिलांच्या इच्छेसाठी ती झाली गावची पोलीस पाटील

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
उच्चशिक्षित होऊन देखील केवळ आपल्या वडिलांच्या इच्छेखातर पुणे- मुबंईची आरामदायक जिंदगी ठोकरून गावच्या मातीत काम करण्यासाठी उभी राहणारी ती… उच्चशिक्षित असल्याने अमाप यश पदरात पाडायचं सोडून पोलीस पाटील होऊन बांधावरचे वाद मिटवणारी ती… आणि विवाह झाल्या नंतर देखील जन्मगाव माहेरची सेवा करणारी ती… आज प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय बनली आहे. ती आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी या गावची पोलीस पाटील मयुरी राऊत-बनकर पाटील.

आयुष्यभर आपल्या मुलीला उभे करण्यासाठी प्रसंगी खस्ता खाऊन पदरमोड करून पुण्याला शिक्षणासाठी पाठविलेल्या वडिलांनी ; उभ्या आयुष्यात स्वतःची एकच इच्छा मुलीला बोलून दाखवली. स्वतःच्या वडिलांच्या इच्छेखातर मग आपले करियरची दिशा बदलत स्वतःचे स्वप्न सोडून ती थेट पोलीस पाटीलच्या पदासाठी परीक्षेला बसली. सर्वांचे आशीर्वाद अन गावची सेवा करण्याची सुप्त इच्छा तिला विजयी करून गेली. मयूरी बनकरच्या रूपाने गावात पहिल्यांदाच बनकर परिवारात पाटीलकी आली. आज मयुरी बनकर हे एक आदराने घेतले जाणारे नाव झाले आहे. वडिलांना देखील एक वेगळी ओळख मिळवून देणारी मयुरी आज गावातले वाद मोठ्या मुत्सद्दीगिरीने मिटवताना दिसून येते.

गावातील कामगारांच्या थकीत पगारामध्ये सहकार्य असो, तरुण मुलींना मार्गदर्शन, बांधावरचे वाद मिटविणे असो वा कौटुंबिक वाद… मयुरी त्या ठिकाणी घोंगडं भिजत ठेवत नाही. थेट आणि रोखठोक कामाची पद्धत, निष्पक्षपाती पणा या मयुरीच्या जमेच्या बाजू लोकांना विशेष भावतात. हे सगळे करत असताना साथ लाभते ती तिचे पती उमेश राऊत यांची… आपल्या पत्नीच्या कामाला सोयीस्कर ठरावे यासाठी हा माणूस पुणे सोडून वेगळ्या जीवन शैलीत तिच्या सोबत चिंबळीत दाखल झाला… अन लग्न झाल्यावर ही कसली पाटीलकी करते ? असे म्हणणाऱ्याच्या तोंडावर कायमचे बोट बसले. आज मयुरी बेधडकपणे वाट्याला आलेल्या कठीण कामाला सामोरे जात आहे. स्वतःच्या एक वर्षाच्या मुलाला सांभाळत कोरोना महामारीत मयुरी रस्त्यावर उतरली. जवळपास तीन ते चार हजार कामगारांना प्रशासनाच्या मदतीने परराज्यात मूळगावी पाठविणे असो वा ऐनवेळी घ्यावयाचे बंदीचे निर्णय असो तिने ही जबाबदारी समर्थपणे पेलली. गावातील मराठी शाळा ते पुण्यातील एस.एन.डी.टी.कॉलेज मधील वाणिज्य शाखेची पदवी व त्यानंतर एम.बी.ए. असा मयुरीचा शैक्षणिक प्रवास राहिला आहे.

आपल्या आज वरच्या प्रवासाबाबत बोलताना मयुरी बनकर पाटील सांगतात, “लहानपणा पासून शिक्षणाची आवड तसेच आयुष्यात काही तरी करून दाखवायचे असे नेहमी वाटायचे. आपल्या स्वतःच्या नावाने आपली ओळख असावी असे वाटायचे. शालेय जीवनापासूनच नेतृत्व करण्याची संधी मिळावी, आपल्या समाजात अजूनही स्त्रीभ्रूण हत्या होते, मुलगी नको असा समाजाचा दृष्टीकोण आहे. पण माझ्या आई वडिलांनी असा भेदाभाव कधीच केला नाही. ते मला नेहमी प्रोत्साहन देत आले. कोरोना महामारीच्या जागतिक आपत्तीच्या संकटकाळात माझ्या गावाची निस्वार्थपणे सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला आला. माझ्या जन्मभुमीसाठी मदतीस धावून येऊ शकले. हे मी माझे भाग्य समजते. आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो असा विचार करून समाजसेवा करत आहे व या पुढेही एवढ्यावरच न थांबता खूप काही करायचे आहे. समाजसेवे सारखे सुख कशातच नाही असे मी अनुभवातून सांगू शकते.”

स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेऊ पाहणाऱ्या मयुरीला आपल्या गावातील महिलांबाबत विशेष मदतीचे भावना वाटते. शिक्षित तसेच अशिक्षित महिलांना आपल्या स्वतःच्या संसारामध्ये कसा हातभार लावता येईल, तसेच महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायाच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल, यासाठी त्यांना प्रयत्न करायचा आहे. पुरुषांपेक्षा स्त्री ही जास्त कणखर असते. कितीहि असंख्य जीवघेणे प्रसंग पेलण्याची शक्ती तिच्या मध्ये असते आणि महिलांचे सबलीकरण करण्याची खरी गरज आहे असे त्या सांगतात.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.