महाबुलेटीन न्यूज
लोणावळा : लोणावळ्यातील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये 50 लाख रुपये रोख व 16 लाख 77 हजार 500 रुपयांचे दागिने असा साधारण 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला आहे.
गुरुवारी (17 जुन) च्या पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा पडला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले, तर अन्य काही जण घराबाहेर थांबले होते. डाॅक्टर खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत हात पाय बांधत घरातील सर्व रोख रक्कम व सोनं असा ऐवज त्यांच्या समक्ष लुटला. साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चादर बांधत ते खाली उतरले व फरार झाले.
घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पद्माकर घनवट यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली व घटनास्थळाचा पंचनामा केला.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.