विधायक

संत तुकाराम नगर मध्ये लोकसहभागातून साकारले तुकोबांचे मंदिर…

महाबुलेटीन नेटवर्क / सुनील देवकर
खेड तालुक्यातील जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी मध्ये, श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदे गावातील श्री संत तुकाराम नगर हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
हो त्याचं कारणही तसंच आहे.
श्री संत तुकाराम नगर मधील जुने जाणते लोक सांगतात की, तुकोबाराया जेव्हा भामचंद्र डोंगरावर साधना करण्यासाठी येत असे त्यावेळेस विश्रांती घेण्यासाठी शिंदे गावातील याच छोट्याशा वस्तीवर म्हणजेच सध्याच्या काळातले श्री संत तुकाराम नगर मध्ये ते विश्रांतीसाठी थांबत असतील, असे येथील जुन्या जानत्या भाविकांना वाटले. त्यामुळे येथील तरुणांनी युवा उद्योजकांनी तसेच संत तुकाराम नगर मधील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन येथे श्री संत तुकाराम महाराज यांचे मंदिर उभारणीचा संकल्प केला आणि तो निर्विघ्नपणे पूर्णत्वास नेला.
त्यानुसार झालेल्या प्रथम बैठकीत सर्वांनी एकोप्याने पुढे येऊन पुढाकार दर्शविला. मंदिरासाठी प्रथम महत्त्वाची गोष्ट गरजेची होती ती म्हणजे मंदिर बांधण्यासाठी लागणारी जमीन. त्यासाठी संत तुकाराम नगर मधील रहिवाशी नारायण भिकाजी पानमंद यांनी दोन गुंठे जमीन मंदिरासाठी बक्षीस पत्र म्हणून दिली.
तसेच या मंदिराच्या बांधकामासाठी मोठा निधी लागणार होता. त्याची उणीव भरून काढण्यासाठी संत तुकाराम नगर मधील रहिवाशांनी एक स्वतःची जबाबदारी म्हणून लोकवर्गणीतून ते काम पूर्ण करण्यासाठी येथील तरुणांनी संत तुकाराम नगर मधील नागरिकांकडून व पंचक्रोशीतील उद्योजकांकडून तसेच भाविकांकडून १७ लाख रुपये जमा करून मंदिर व कळसाचे काम पूर्ण केले.
जि. प. सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या जिल्हा परिषद निधीतून २५ लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याने सभामंडप, मंदिराकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता, व्यायाम शाळा, व्यायाम शाळेचे साहित्य, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लाईट, जेष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बैठक व्यवस्था, इत्यादी कामे मार्गी लागल्याचे समाधान श्री संत तुकाराम नगर मधील रहिवाशी व्यक्त करत असल्याचे तेथील सामाजिक कार्यकर्ते मंदीरातील पुजारी ह.भ.प. सुरेश महाराज टेमगीरे यांनी सांगितले.
तसेच या मंदिराच्या वरती आधुनिक व्यायाम शाळेच बांधकाम केले असून त्या व्यायाम शाळेमध्ये संत तुकाराम नगर मधील २५ ते ३० तरुण रोज सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करतात.
भक्ती आणि शक्ती खऱ्या अर्थाने एकत्र येऊन मानवाचा विकास  चांगला कशाप्रकारे होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण येथील तरुणांनी दाखवून दिले आहे. तसेच ग्रामपंचायतीने या चांगल्या कामाची दखल घेऊन संत तुकाराम नगर मध्ये येणाऱ्या सिमेंट कॉंक्रिटीकरणच्या रस्त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
संत तुकाराम नगर मध्ये २५ ते ३० घरांचा समावेश आहे.
या २५ ते ३० घरांमध्ये एकोपा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांनी पुढे येऊन मागील चार वर्षाच्या काळात संत तुकाराम नगर मध्ये तब्बल ५२ लाख रुपयांची विकासकामे केली आहेत. येणाऱ्या पुढील काही वर्षात संत तुकाराम नगर हे पंचक्रोशीतील एक आदर्श नगर म्हणून ओळखले जाईल.
असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकर यांनी व्यक्त केला.
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.