विधायक

लॉकडाऊन काळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना साडे सहा ते साडे दहा हजाराची पगारवाढ

कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण, प्रामाणिकपणे काम केल्याची पोच पावती
महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकर
चाकण : मेदनकरवाडी ( ता.खेड ) येथील ग्रामपंचायतने ग्रामपंचायतीच्या 18  कर्मचाऱ्यांना 6,500 ते 10,500 इतकी मोठी पगारवाढ केली आहे. कोरोना कालावधीत देखील भरीव पगारवाढ केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना कालावधीत कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत, इतर ग्रामपंचायतींच्या तुलनेत जास्त पगारवाढ करण्यात आली असून पगारवाढीचा चेक मेदनकरवाडीच्या सरपंच सौ. प्रियांकाताई मेदनकर-चौधरी, उपसरपंच सौ. दिपीका गोरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या वरिष्ठ लिपिक सौ. रेखा भुजबळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. कोरोना कालावधीत सगळीकडे आर्थिक मंदी असतानाही कर्मचाऱ्यांना  पगारवाढ करणारी महाराष्ट्रातील ही एकमेव ग्रामपंचायत असू शकते, असे सरपंचांनी महाबुलेटीनशी बोलताना सांगितले.
या प्रसंगी माजी सरपंच व ग्रा. पं. सदस्य रामदास मेदनकर, महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर, नंदाराम भुजबळ, जगदीश मेदनकर, सौ. छाया भुजबळ, सौ. जयश्री भुजबळ, ग्रामविकास अधिकारी श्री. अरुण हुलगे, श्री. सुभाष भुजबळ, श्री. पांडुरंग लष्करे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.