आरोग्य

लसीकरणाचा उडतोय बोजवारा.. राजकीय कार्यकर्त्यांचा होतोय हस्तक्षेप – नागरिकांचा आरोप

लसीकरणाचा उडतोय बोजवारा..
राजकीय कार्यकर्त्यांचा होतोय हस्तक्षेप – नागरिकांचा आरोप

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
उरुळी कांचन : गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये कोरोना संसर्गाच्या महामारीने सर्वसामान्य जनतेला तसेच राज्यकर्त्यांना कमालीचे घेरलेले आहे, या मधून सुटका करताना देश पातळीवरील तसेच राज्य पातळीवर राज्यकर्त्यांची त्रेधा तिरपीट उडत असताना, या आजारावर उपाय योजना म्हणून सर्व देशांनी महत्प्रयासाने लस शोधून काढली आहे व त्याचा वापर करून या महामारीला अटकाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. यासाठी आपल्या भारत देशांमधून दोन लसी प्रथमदर्शनी शोधलेल्या असून त्याचा वापर सुरू झालेला आहे, त्यापैकी एक आहे सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हिशील्ड तर दुसरी आहे भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्सीन या दोन लसींच्या निर्मितीमुळे भारतातील नागरिकांना या महामारीतून बचाव करण्यासाठी निश्‍चितपणे मदत होत आहे. केंद्र सरकार द्वारे राज्य सरकारांना या लसीचे उपलब्धतेनुसार वाटप केले जात आहे व त्याद्वारे लसीकरण कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे काम करीत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून कार्यरत असणारी जिल्हा प्रशासन यंत्रणा हा लसीकरणाचा कार्यक्रम पुणे जिल्ह्यात राबवित आहे. पण नियोजनाचा अभाव लशींचा तुटवडा आणि दररोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी वेगवेगळे निर्णय यामुळे ही मोहीम राबविणाऱ्या यंत्रणेचा उडणारा गोंधळ आणि राजकीय कार्यकर्त्यांचा नको इतका हस्तक्षेप या मोहीमेला खीळ घालत असल्याची भावना उरुळी कांचन सजग नागरिक मंचाचे प्रकाश जगताप, संभाजी कांचन, प्रकाश कांचन, किशोर कांचन, सुजित कांचन यांनी व्यक्त केली.                 

केंद्र सरकारद्वारे राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याला मिळालेले लसीच्या डोसांचे प्रमाण व वापर पुढीलप्रमाणे २१/०५/२०२१ पर्यंतची स्थिती असल्याची माहिती डॉ.सचिन एखंडे (सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी) यांनी दिली.
पुणे जिल्हा ग्रामिण :-  कोव्हीशिल्डचे १०४८८४० , कोव्हॅक्सिनचे १०३३४० एकूण ११५२१८० मिळालेले डोस पैकी वापर ११४३९९० डोस, शिल्लक ८१९० डोस,पीएमसी :- कोव्हीशिल्डचे ८४१८२०, कोव्हॅक्सिनचे १२४६५०,एकूण ९६५९७० मिळालेले डोस पैकी वापर ९५८५५० डोस,शिल्लक ७४२० डोस.पीसीएमसी :-  कोव्हीशिल्डचे ४२८५१०, कोव्हॅक्सिनचे ५०४९० एकूण ४७९००० मिळालेले डोस पैकी वापर ४७७२४० डोस शिल्लक डोस १७६० तसेच पुढील आठवड्यासाठी मागणी केलेल्या डोसची संख्या पुणे जिल्हा ग्रामीणसाठी २ लाख ५० हजार, पीएमसी साठी १ लाख ४० हजार तर पीसीएमसी साठी ९० हजार अशी असल्याची माहिती त्यांनी दिली.

मात्र केंद्र सरकार व राज्य सरकारे लसीकरण कार्यक्रमावर एकमेकांना दोष देत आरोप – प्रत्यारोप करीत जबाबदारी टाळून नाकर्तेपणा दाखवीत आहेत ते टाळून केंद्राने राजकारण न करता राज्याच्या लोकसंख्येवर आधारित लसीचे डोस पुरवावेत व राज्य सरकारने कोणताही हलगर्जीपणा न करता हा लसीकरणाचा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने राबवून, जास्तीत जास्त नागरिकांना उपलब्ध लसीच्या  डोसाद्वारे लस देऊन कोरोना महामारी पासून सुरक्षित करावे अशी भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे. 

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.