आरोग्य

लसीकरणाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा : डॉ. जाधव

 

ग्रामीण रुग्णालय अधिक्षकांचे आवाहन
आळंदीत लसीकरण सुविधा उत्साही प्रतिसाद

महाबुलेटीन न्यूज 
आळंदी (अर्जुन मेदनकर) : कोविडच्या काळात आळंदी परिसरातील आरोग्य सेवा देणा-या आळंदी ग्रामीण रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांनी देखील सेवाभाव जोपासत कौतुकास्पद काम केलेले आहे. शासनाचे माध्यमातून आता लसीकरण आळंदीत सुरू करण्यात आलेले आहे. नागरिकांनी या लसीकरण सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. जी. जाधव यांनी केले.

आळंदी ग्रामीण रुग्णालयात मोफत शासकीय तसेच इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये खाजगी सेवाशुल्क आकारून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आळंदी ग्रामीण रूग्णालयात नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण सुविधा केंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले असल्याची माहिती देताना डॉ. जाधव बोलत होते. याप्रसंगी रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.

या सुविधा केंद्रात जेष्ठ नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. आवश्यक त्या प्रमाणात लस उपलब्ध करून असून आळंदीत व्यापारी, नागरिकांची अॅन्टीजेन चाचणी देखील करण्यात आली असून ही मोहीम सुरू आहे. यास येथील व्यापारी व नागरिकांनी देखील प्रतिसाद देत तपासणी करून घेत आहेत. रुग्णालयात शासनाचे नियमा प्रमाणे मोफत कोविड लसीकरण करण्यात येत असल्याचे डॉ. जाधव यांनी संगितले.

आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर म्हणाल्या, कोविड या महामारीचे संकटापासून वाचण्यासाठी सर्व जेष्ठ नागरिक, सहरूग्णता तसेच शासनाचे धोरणा प्रमाणे लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे. शासनाने आळंदी ग्रामीण रुग्णालयात मोफत लसीचे डोस उपलब्ध करून दिले असून याचा लाभ आपल्या व सामाजिक आरोग्याचे दृष्टीने सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान लसीकरणास गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करून मास्कचा वापर करीत लसीकरण करून घ्यावे.

आळंदीत ४ ने रुग्ण संख्या वाढून अँक्टिव्ह रुग्ण संख्या २९

आळंदीसह पंचक्रोशीत कोरोंना रुग्णाची संख्या वाढत आहे. आळंदीत रविवारी (दि.२८) ४ रुग्ण आढळले असून ३ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता १२१२ झाली आहे. अशी माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली. आळंदी पोलिस व पालिका प्रशासन यांनी विना मास्क फिरणा-यावर कारवाई मोहीम तीव्र केली असून अनेकांवर गुन्हे देखील दाखल करीत उचांकी दंड वसूली केला.

आळंदीत रुग्णांची संख्या वाढू लागली असून गेल्या आठवड्याचे तुलनेत आता रुग्ण संख्या २९ पर्यन्त खाली आली आहे. १७ मार्च २०२१ अखेर आळंदीत ५२ रुग्ण अँक्टिव्ह होते. अँक्टिव्ह रुग्ण आळंदीत कमी होताना आरोग्य विभागाचे अहवालातून दिसत आहे. मात्र परिसरात रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत आळंदीतील १५ रुग्णांचे निधन झाले. १२१२ रुग्ण बरे होऊन घरी सुखरुप पोहचले आहेत.

रविवार (दि.२८) अखेर खेड तालुक्यात एकाच दिवशी ९४ रुग्ण अँक्टिव्ह मिळाले. खेड तालुक्यात ८१ रुग्ण बरे झाल्याने रविवारी घरी सोडण्यात आले आहेत. २०८ रूग्णांचे निधन खेड तालुक्यात आता पर्यन्त झाले आहे. रविवार अखेर ६८३ रुग्ण तालुक्यात अँक्टिव्ह असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. आळंदी परिसरात आळंदीत ४, चिंबळी ३, मोई, च-होली खुर्द व धानोरे, शेलगाव प्रत्येकी २ रुग्ण, शेलपिंपळगाव मध्ये १ रुग्ण आढळून आले आहेत. आळंदी पंचक्रोशीत देखील कोरोना रुग्ण वाढत असल्याने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी मास्क वापरण्यासह प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
———–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.