महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
राजगुरुनगर : हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाचीतून धारदार
शस्त्रानं चुलत भावाचा गळा कापून खुन केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील किवळे येथे घडली आहे. याप्रकरणी चुलत भावाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमजान आदमभाई शेख (रा. किवळे ता खेड ) असे खून झालेल्याचे नाव असून ते कुरकुंडी येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून काम करीत होते. याप्रकरणी त्यांचा चुलतभाऊ रफिक पमा शेख (रा. आहिरे, ता. खेड, जि. पुणे ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चंद्रकांत सुदाम शिवले (वय ३६ रा. किवळे, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रमजान, आरोपी रफिक
शेख व फिर्यादी चंद्रकांत शिवले हे शनिवारी ११ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता शिवले याच्या मोटारसायकलवर ट्रिपल सीट चांदूस येथे जात होते. पाईट ते शिरोली रस्त्यावर एका पोल्ट्री फार्म दरम्यान रमजान शेख व रफिक शेख यांचे हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाचीचे कारणावरून रफिक शेख याने धारदार हत्याराने रमजान शेख यांचे गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. गळ्याला गंभीर जखम झाल्याने रमजान शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान रफिक शेख चालत्या मोटरसायकल वरून उडी
मारून पळून गेला. या घटनेबाबत चंद्रकांत सुदाम शिवले यांनी
खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रफिक शेख हा फरार
झाला असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड पुढील तपास करित आहे.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.