सामाजिक

कोरोनाविषयक जनजागृती, ऑनलाईन प्रश्नमंजुषेस उत्स्फूर्त प्रतिसाद

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सुरु केलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा उपक्रमास तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोनच दिवसात २५८ नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.
या विषयी माहिती देताना परीट यांनी सांगितले की, कोरोनाबाबत लोक कितपत जागरुक आहे. ते कोरोनाची लक्षणे, त्याच्या विषाणूंपासून ते स्वत:चे रक्षण कश्या पध्दतीने करत आहेत. हे तपासण्यासाठी प्रशासनाने हा उपक्रम आखला होता. कोरोनासंदर्भातील लिंक लोकांच्या मोबाईलवर पाठवायची. त्यांच्याकडून उत्तरे जाणून घ्यायची. त्यावर त्यांना गुण द्यायचे, असे या उपक्रमाचे स्वरुप होते. त्यानुसार आम्ही दोन दिवसांपूर्वी तशी लिंक आम्ही पाठवली होती.
या उपक्रमास लोकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दोन दिवसात २५८ जणांनी त्यामध्ये सहभाग घेतला. कोरोनासंदर्भात दहा मूलभूत प्रश्नांची उत्तरे सहभागी लोकांनी बिनचूक दिली. ती जागरुकता केवळ मिळणा-या गुणांपूरती मर्यादित नाही. वैद्यकीय कारणापुरते लोक एकमेकांपासून काहीसे दूर गेले असले तरी, ते वैद्यकीय निकषांचे अनुसरण करीत असल्याचे निरीक्षण परीट यांनी नोंदवले.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

3 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 day ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.