महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने ‘शेतकरीविरोधी कायदे’ या विषयावर 7 ते 14 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यात दोनशे पन्नासहून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी दिली.
प्रा.डॉ. शैलजा बरुरे ह्या शिबिराचे उदघाटन करणार असून अमर हबीब हे समारोपाचे व्याख्यान देणार आहेत.
हे शिबिर गुगल मीट या अँपवर दररोज सायं 7 ते 8.30 या वेळात होईल.
या शिबिरात सुभाष कच्छवे (परभणी) हे सिलिंग कायदा, बालाजी आबादार (नांदेड) आवश्यक वस्तू कायदा, ऍड.अनंत बावणे (लातूर) जमीन अधिग्रहण कायदा समजावून सांगतील. परिशिष्ट 9 व अन्य शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या बद्दल ऍड. डी.एस. कोरे (लातूर-पुणे) हे विवेचन करणार आहेत. तसेच नितीन राठोड (उस्मानाबाद) हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची रणनीती अर्थात किसानपुत्र आंदोलन यावर बोलतील. ‘सर्जकांचे स्वातंत्र्य’ या विषयावर सौ.संगीता देशमुख (वसमत) मार्गदर्शन करणार आहेत.
मयूर बागुल (अंमळनेर-पुणे) व अंकुश खानसोळे (नांदेड) हे शिबिराचे संयोजक असून तांत्रिक सहयोग असलम सय्यद (आंबाजोगाई-पुणे) करणार आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातुन शिबिरार्थीं भाग घेत आहेत.
■ लॉकडाऊनच्या काळात किसानपुत्र आंदोलनाने एक महिन्याची व्याख्यानमाला चालवली तसेच एक अनोखी व्हिडीओ स्पर्धाही घेतली. त्या पाठोपाठ राज्यस्तरीय शिबिर घेतले, त्या पाठोपाठ मराठवाडा विभागीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. असेच विदर्भ विभागीय शिबिर ऑक्टोबर मध्ये होणार आहे. – मयूर बागुल
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
This website uses cookies.