कृषी

किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर, 9 ऑगस्टला होणार सुरुवात

200 हून अधिक शिबिरार्थी होणार सहभागी
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटीन न्यूज /आनंद कांबळे
जुन्नर : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने ‘शेतकरीविरोधी कायदे’ या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यात दोनशे हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली.
हे शिबिर गुगल मीट वर दररोज सायं 5 ते 6.30 या वेळात होईल. ‘चपराक’चे संपादक घन:श्याम पाटील हे शिबिराचे उदघाटन करणार असून अमर हबीब हे समारोपाचे व्याख्यान देणार आहेत.
या शिबिरात डॉ. विकास सुकाळे (नांदेड) हे सिलिंग कायदा, ऍड भूषण पाटील (औरंगाबाद) आवश्यक वस्तू कायदा, नंदकुमार उगले (नाशिक) जमीन अधिग्रहण कायदा समजावून सांगतील. परिशिष्ट 9 व अन्य शेतकरीविरोधी घटनांदुरुस्त्या बद्दल ऍड. महेश गजेंद्रगडकर (पुणे) हे विवेचन करणार आहेत. तसेच संदीप रोडे (अमरावती) हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची रणनीती अर्थात किसानपुत्र आंदोलन या वर बोलतील. समारोप सत्रात ‘सर्जकांचे स्वातंत्र्य’ या विषयावर अमर हबीब मार्गदर्शन करणार आहेत.
मयूर बागुल (अंमळनेर-पुणे) हे शिबिराचे संयोजक असून तांत्रिक सहयोग असलम सय्यद (आंबाजोगाई-पुणे) करणार आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातुन शिबिरार्थींना भाग घेतला आहे.
■ लॉकडाऊनच्या काळात किसानपुत्र आंदोलनाने एक महिन्याची व्याख्यानमाला चालवली तसेच एक अनोखी व्हिडीओ स्पर्धाही घेतली. त्या पाठोपाठ ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

13 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

2 days ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.