पिंपरी-चिंचवड ( दि. २३ ) : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तरूणाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह डिझेल टाकून जाळला आणि मृतदेहाचे उर्वरित अवशेष नदीत टाकले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून एका अल्पशा माहितीवरून पिंपरी पोलिसांनी या खुनाचा तातडीने तपास चौघांना ताब्यात घेतलं आहे.
बिल्लू ऊर्फ विक्की ऊर्फ जसबीर सिंग विरदी या एकोणविस वर्षीय तरुणाचा या घटनेत खून झाला आहे. मृत्यू झाला. तर बिल्लूचा खून केल्या प्रकरणी त्याच्याच ओळखीच्या असलेल्या नीरज जांगयानी, ललित ठाकूर , योगेश पंजवानी आणि हरज्योत सिंग लोहीट या चोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मयत बिल्लू आणि आरोपी आणि त्याच्या भावाने आरोपी नीरज याला मारहाण केली होती. तसंच आरोपीला काचेची बाटली फोडून मारली होती. मात्र, त्याच दिवशी आरोपी आणि मयत हे एकत्र आले. त्यांनी एकमेकांची माफी मागितली.
मात्र, त्यानंतर रात्री ते पुन्हा नशा करण्यासाठी एकत्र बसले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा भांडण झालं. यावेळी चिडलेल्या आरोपीने बिल्लू याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पिंपरीतील डेअरी फार्मजवळ नेऊन डिझेल टाकून जाळून टाकला. गंभीर म्हणजे मृतदेह पुर्णपणे जळाला नाही हे लक्षात आल्यावर, दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन त्यांनी डिझेल टाकून तो मृतदेह जाळला. मृतदेहाचे उर्वरित अवशेष आणि हाडं दापोडी इथल्या नदीपात्रात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दोन दिवसानंतरही मुलगा घरी आला नसल्याने बिल्लूच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केली. रविवारी दुपारी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांना या खूनासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली. हद्दीतून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा खून करून मृतदेह डेअरी फार्मजवळ जाळून टाकल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी काहीतरी जाळल्याचं दिसून आलं.
चारही संशयितांना ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आता या प्रकरणाबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.