महाराष्ट्र

खुनाचे फोटो इंस्टाग्रामवर ठेवल्याने महाळुंगे इंगळे गावातील अपहृत तरुणाचा निर्घृण खून, एकास अटक, मृतदेह महाराष्ट्र-गुजरात बॉर्डरवरील जंगलात जाळल्याची आरोपीची कबुली

महाबुलेटीन न्यूज
चाकण :
चाकण उद्योगनगरीतील महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील १० दिवसापूर्वी अपहरण झालेल्या १८ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. आदित्य युवराज भांगरे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्यला बेदम मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील जंगलात जाळल्याची धक्कादायक माहिती चाकण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी अमर नामदेव शिंदे ( वय २५ वर्षे, रा. कासार आंबोली, ता. मुळशी. जि. पुणे ) यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, १६ मार्च २०२४ रोजी महाळुंगे इंगळे गावातील भांगरे वस्ती येथील आदित्य युवराज भांगरे (वय-१८ वर्षे) यास काही अनोळखी व्यक्तींनी घराजवळून अपहरण केल्याची फिर्याद आदित्यच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता एका संशयित आरोपीस चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले होते. आरोपीने खुनाची कबुली देताना सांगितले कि, त्याचा सहकारी आरोपी राहुल पवार याचे भावाचा खून झाला होता. त्याचे छन्न विछिन्न अवस्थेतील चेहऱ्याचे फोटो इंस्टाग्रामला पोस्ट केले होते. याचा राग मनात धरून आदित्यला बेदम मारहाण करून वाहनातच गळा आवळून निर्घृण खून केल्याची कबुली अटक केलेल्या आरोपीने दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट देऊन आदित्यचे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे नमुने जुळवून प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

या गंभीर घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व कल्याण घाडगे हे करत आहेत.  

MahaBulletinTeam

Recent Posts

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

1 hour ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

This website uses cookies.