महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : राजगुरूनगर येथील खांडगे लॉन्स मध्ये 8 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता खेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची सोडत जाहिर केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले व प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतींसह खेड तालुक्यातील 162 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत मंगळवारी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तहसिल पातळीवर ही सोडत जाहिर केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतीच्या 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2025 या कालावधीसाठी ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या सोडतींचा कार्यक्रम 27 मार्च 2020 रोजी होणार होता. त्यापुर्वी कोरोना महामारीमुळे देशात व राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्याने ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरच्या पत्राद्वारे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिद्ध केल्याने सदर ग्रामपंचायत निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात.
याकरिता ग्रामपंचायत सरपंच पदाची सोडत कार्यक्रम मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी तहसिलदारांनी शासनाचे कोविड 19 संदर्भातील सुरक्षेचे नियम पाळत आयोजित करावा, असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी आदेशात म्हंटले आहे.
पुणे जिल्ह्यात 1400 ग्रामपंचायतीं पैकी 114 ग्रामपंचायती ह्या अनुसुचित क्षेत्रातील आहेत. यामध्ये खेड तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
लोकसंख्या निहाय उर्वरित 1286 ग्रामपंचायतींमध्ये अनुसुचित जमातीकरिता 125, अनुसुचित जाती करिता 58, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 347 व सर्वसाधारणसाठी 756 सरपंच पदे अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यापैकी 50 टक्के पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत.
खेड तालुक्यात लोकसंख्या निहाय 162 ग्रामपंचायतींमध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी अनुसुचित जमातीकरिता 9, अनुसुचित जाती करिता 13, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 38 व सर्वसाधारणसाठी 81, तर अनुसूचित क्षेत्रासाठी अनुसूचित जमातीला 21 सरपंच पदे अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यापैकी 50 टक्के पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.