महाबुलेटिन न्यूज नेटवर्क : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : खेड तालुक्यात पदवीधर मतदार संघासाठी ५२.८२ टक्के, तर शिक्षक मतदार संघासाठी ६८.३८ टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी राजगुरूनगर ( ता. खेड ) येथील महात्मा गांधी विद्यालयात सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदारांचा उत्साह जाणवत होता. दुपारनंतर मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर तुरळक मतदार येत होते व आपल्या मताचे दान देऊन जात होते.
तालुक्यातील मतदार हे मोजकेच असल्यामुळे तत्सम संबंधित पक्षाचे कार्यकर्ते एका मतासाठी वारंवार आपल्या संपर्कातील मतदारांना फोनवरून संपर्क करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. अनेक मतदारांनी पदवीधरसाठी नाव नोंदणी केली होती. मात्र त्यांचे मतदार यादीत नाव न आल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. पदवीधर
मतदार आणि शिक्षक मतदार संघासाठी खेड तालुक्यामध्ये
आळंदी देवाची, चाकण, कडूस, पाईट, वाडा व राजगुरूनगर अशी ६ मतदान केंद्र होती.
◆ आळंदी देवाची मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण ४५७ मतदार होते. त्यापैकी २१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ४७.२६% मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी १५९ मतदार असून त्यापैकी ९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाअसून तेथे ५९.११ % मतदान झाले.
◆ चाकण मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण ८११ मतदार होते. त्यापैकी ३८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ४६.८५ % मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी १४७ मतदार होते. त्यापैकी १०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ७३.४६ % मतदान झाले.
◆ कडूस मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण २८९ मतदार होते. त्यापैकी १४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ४९.१३ % मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी ४९ मतदार होते, त्यापैकी २८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ५७.१४ % मतदान झाले.
◆ राजगुरूनगर मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण १२२९ मतदार होते. त्यापैकी ७३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ५९.८३ % मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी २७८ मतदार होते, त्यापैकी २०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ७४.१० % मतदान झाले.
◆ पाईट मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण २०३ मतदार होते. त्यापैकी १०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ४९.२६% मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी १६ मतदार होते, त्यापैकी १० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ६२.५ % मतदान झाले.
◆ वाडा मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी एकूण ७२ मतदार होते. त्यापैकी ४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे ५९.७२ % मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघासाठी ०९ मतदार होते, त्यापैकी ०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तेथे ४४.४४ % मतदान झाले. पदवीधर मतदार संघासाठी ५२.८२ टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी ६८.३८ टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांतजी चव्हाण यांनी दिली.
यावेळी मतदान जरी मोजकेच असले तरी मतदान केंद्रावर सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले होते. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतिश गुरव व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी इप्पर मंचक यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. इप्पर मंचक यांनी चाकण मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
तालुक्यातील विविध मतदान केंद्रावर खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, मनसेचे अध्यक्ष समीर थिगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे आदींनी भेटी देऊन माहिती घेतली.
■ खेड तालुका
● पदवीधर….
एकूण मतदान – ३०६१
झालेले मतदान – १६१७
एकूण टक्के – ५२.८२
● शिक्षक…..
एकूण मतदान – ६५८
झालेले मतदान – ४५०
एकूण टक्के – ६८.३८
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.