कोरोना

खेड तालुक्यात आज १५८ कोरोना रुग्ण आढळले, तीन जणांचा मृत्यू, चाकणला सर्वाधिक ३४ रुग्ण,

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : खेड तालुक्यात शनिवार (दि. १९) रोजी १५८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८८७ झाली आहे. आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ५६८२ वर गेली आहे. आज कुरकुंडी येथील ७३ वर्षीय पुरुष, भोसे येथील ८२ वर्षीय पुरुष व वाफगाव येथील ८० वर्षीय पुरुष असा ३ वृद्ध रुग्णांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे आणि डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. 

कोरोना बाधितांमध्ये राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीतील १४, चाकण नगरपरिषद हद्दीतील ३४ आणि आळंदी नगरपरिषद हद्दीतील २० तसेच ग्रामीण भागातील  ९० पैकी दोंदे, चिंबळी, कुरुळीतील प्रत्येकी ३ रुग्ण, आंबेठाण, बिरदवडी, येलवाडी, राक्षेवाडी, सांडभोरवाडी, गोळेगाव, शेलगाव, भोसे येथील प्रत्येकी २ रुग्ण, काडाचीवाडी, खालूंब्रे, निघोजे, वाकी खु., बुट्टेवाडी, ढोरे भांबुरवाडी, होलेवाडी, टाकळकरवाडी, संतोषनगर, सातकरस्थळ, भोसे, चऱ्होली खु., कोयाळी, मरकळ, सोळू, वडगाव घेनंद, रासे, शेलपिंपळ्गाव, कडधे, गुंडाळवाडी, जऊळके खु., वाफगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण, नाणेकरवाडी ९ रुग्ण, मोई ४ रुग्ण, मेदनकरवाडी ९ रुग्ण तर महाळुंगे व खराबवाडी येथील प्रत्येकी ११ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान राजगुरुनगर, चाकण, आळंदी शहरातील करोना बाधितांची संख्या ६८ तर ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या ९० पर्यंत गेली आहे. आत्तापर्यंत एकूण १३० बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमार्फत राजगुरुनगर शहरातील शुक्रवार (दि.१८) आणि शनिवार (दि,१९) या दोन दिवसात ९२६९ कुटुंबांपैकी ४५०६ कुटुंबांची तपासणी झाली असून रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये ३ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी १ रुग्णास त्याचे घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.