महाबुलेटीन न्यूज : दत्ता घुले
शिंदे-वासुली, दि. ५ : संपूर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार उडाला असताना हा आजार बरा करणारं कोणतंही औषध बाजारात उपलब्ध नाही. परंतु कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत व्हॅक्सिनच प्रभावी ठरु शकते. म्हणूनच भारत सरकारने पहिल्या टप्प्यात ६० वर्षांवरील व दुसऱ्या टप्प्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीचे सरकारी आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालया़मध्ये गेली ४-५ महिन्या़पासून लसीकरण चालू आहे. खेड तालुक्यात दोन्ही टप्प्यात प्राधान्यक्रम असलेल्या नागरिकांना एकूण ९६९२१ लसीकरणाचे डोस देण्यात आले असून तालुक्यातील एकूण लसिकरण केंद्रांपैकी करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ हजार २०४ विक्रमी लसिकरण झाल्याचे येथील आरोग्य अधिकारी डॉ. निलेशकुमार मोहिते यांनी माहिती दिली.
करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्र व या केंद्राच्या अंतर्गत असलेल्या १२ उपकेंद्रात मध्ये ३३ गावातील वय वर्षे ४५ व वय वर्षे ६० च्या पुढील ज्येष्ठ नागरिकांचे लसिकरण करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी/अधिकारी, फ्रंट लाईन वर्कर, ४५ वर्षांवरील सामान्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाते. आज पर्यंत करंजविहीरे आरोग्य केंद्राला तालुका प्रशासनाकडून १५३४ डोस प्राप्त झाले असून सगळे प्राप्त डोसचे लसिकरण होऊन केंद्रामध्ये अतिरिक्त व्हॅक्सिन शिल्लक नाही.
सुरुवातीला नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत गैरसमज, संभ्रम,भीती वाटत असल्याने उदासीनता असूनही येथील जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटलांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करुन नागरिकांना लसिकरणासाठी आवाहन केल्याने पाईट – पिंपरी जिल्हा परिषद गटामधील पाईट व करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून गावोगाव लसीकरण कॅम्पचे आयोजन केले. त्यामुळे तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्र व इतरत्र होणाऱ्या लसिकरणापेक्षा येथील केंद्रावर होणारे लसिकरणाचे प्रमाण जास्त आहे. येथील आरोग्य केंद्रात दिवसाला किमान १०० जणांना लस दिली जाते. करंजविहीरे व उपकेंद्रामध्ये एकाच दिवशी १४१६ लसिकरणाचा उच्चांक केलेला आहे.
मात्र अजूनही आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ४५ व ६० वर्षे वयांपुढील नागरिकांमध्ये पाहिजे तेवढा उत्साह दिसून येत नाही. त्यामध्ये अचानक व्हॅक्सिन पुरवठा खंडित होतो आहे. येथील लसिकरण लस नसल्याने काही दिवस बंद होते. दोन दिवसांपूर्वी लसीचे २०० डोस प्राप्त झाले होते, परंतु आज केंद्रावर ठणठणाट आहे. अजुनही केंद्रावर पहिल्या दोन्ही टप्प्यातील नागरिक लसीसाठी गर्दी करत असताना शासनाने १८-४४ वयाच्या नागरिकांना लस मिळणार असल्याचे जाहीर केल्याने केंद्रावर खुपचं गर्दी होऊन ताण येणार आहे.
केंद्रामध्ये सुरुवातीला कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसीचे डोस उपलब्ध होत होते. परंतु सध्या कोव्हॅक्सिन उपलब्ध नाही. त्यामुळे ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दूसरा डोस देण्यास अडचण झाल्याचे दिसून येते. पुढील काळात गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने वेळीच खबरदारी व उपाययोजना केल्यास संसर्ग व आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही.
केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री महाजन व डॉ. निलेशकुमार मोहिते यांनी लसीचा सुरळीत पुरवठा झाल्यास लसिकरण अधिक गतीने सुरू ठेवता येईल. याकामी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक यांच्या तत्पर सेवा व कामामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा देणे शक्य होत आहे.
०००००
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.