विधायक

खेड तालुक्यामध्ये भिंतीचित्रांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती अभियान

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : जगभरामध्ये कोरोनाव्हायरसने थैमान घातले असून भारतातही मोठ्या प्रमाणात या व्हायरसने आपले हात-पाय पसरले आहेत. प्रसार माध्यमे व सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाव्हायरस विषयी जनजागृती होत आहे. खेड तालुव्यातील गावातील नागरिकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती व्हावी, यासाठी चाकण येथील महिंद्रा हेवी इंजिन्स लि., यश फौंडेशन व गावातील ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “माझे कुटुंब , माझी जबाबदारी” या ब्रीद वाक्याला डोळ्यासमोर ठेवून भिंती चित्रकलाच्या माध्यमातून कोरोना जनजागृती मोहिमेचे आयोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले. समाजामध्ये कोरोना विषयाशी जनजागृती व्हावी व समाजामध्ये प्रत्येक घटकापर्यंत कलेच्या माध्यमातून कोरोना प्रबोधनाचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहचावा या उद्देशाला साध्य करण्याकरिता सदर भिंती चित्रकलाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर भिंती चित्रीकरणात सुरक्षित अंतर ठेवा, मास्कचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, गर्दी टाळावी, सॅनिटायझरचा वापर करा, हात वारंवार साबण व पाण्याने धुवावे, कोरोना योध्यांचा सन्मान करा इ. संदेश चित्राच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न महिंद्राने केला असून, “कोरोना मुक्त भारत” ध्येय साध्य करण्यासाठी खेड तालुक्यातील गावांमध्ये भिंती चित्रीकरण करण्यात आले.

सदर उपक्रमावेळी श्री. कमलप्रीत सिंग, श्री. संजय मते, श्रीमती शुभा नायर ( महिंद्रा हेवी इंजिन्स लि. चाकण ) अधिकारी वर्ग, यश फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, यश फौंडेशन फौंडेशनचे सयंसेवक, गावातील गावकरी, सरपंच इ . मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “चित्र हे असे माध्यम आहे कि, जे कमी शब्दात आपला प्रभावी संदेश सोप्या शब्दात लोकांपर्यंत पोहचवू शकतो. कोरोना सारख्या विषयाचे प्रबोधन करून अशा कलेच्या द्वारे चित्राच्या स्वरुपात हा संदेश पोहचविण्याचा हा उपक्रम उत्तम आहे.”या उपक्रमात सहभागी स्वयंसेवक, गावकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.