महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या मंगळवार (दि. २९) रोजी घटली असून तालुक्यात आज फक्त ६७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर उपचारानंतर १३० जणांना आज कोरोनमुक्त म्हणून घरी सोडण्यात आले आहे. तालुक्यात आता फक्त ९३२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र होते. तालुक्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर होती. परंतु आजच्या आकडेवारीनुसार आशादायक परिस्थिती दिसून येत असून कोरोना उपचारानंतर पूर्ण बरा होतो; हे तालुक्यात आतापर्यंत कोव्हिड काळजी केंद्रातून उपचार केल्यानंतर बरे झालेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. आत्तापर्यंत खेड तालुक्यात ६९७३ इतकी कोरोनाबाधितांची एकूण संख्या होती. आजपर्यंत ५८८६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी आता फक्त ९३२ रुग्ण कोरोना ॲक्टिव आहेत. हे दिलासादायक चित्र असेच पुढे आठवडाभर राहिले, तर परिस्थिती समाधानकारक व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे डॉ. बळीराम गाढवे यांनी महाबुलेटीनशी बोलताना सांगितले.
तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण, आळंदीया शहरांमधून व शिवे, मेदनकरवाडी, निघोजे, महाळुंगे, नाणेकरवाडी, सातकरस्थळ, तुकाई भांबुरवाडी, सायगाव, आंबेठाण, कोळवे, बुट्टेवाडी, भोसे, चऱ्होली खु., दौंडकरवाडी, मरकळ, रेटवडी या गावातून मंगळवारी (दि. २९) रोजी कोरोनाचे ६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ७० वर्षीय महिला, तर ५८ व ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे.
◆ आज नगरपरिषद हद्दीत २१, तर ग्रामीण भागात ४६ रुग्णांची वाढ,
◆ चाकण मध्ये सर्वाधिक १२ रुग्ण,
◆ एकूण रुग्णांची संख्या ६९७३ पैकी ५८८६ रुग्ण बरे होऊन गेले घरी
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २१ ) : राजगुरूनगर – ५, चाकण – १२, आळंदी – ४
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४६ ) :
# ९ रुग्ण आढळलेली गावे :- शिवे
# ७ रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी, निघोजे
# ४ रुग्ण आढळलेली गावे :- महाळुंगे, नाणेकरवाडी, सातकरस्थळ
# २ रुग्ण आढळलेली गावे :- तुकाई भांबुरवाडी
# १ रुग्ण आढळलेली गावे :- सायगाव, आंबेठाण, कोळवे, बुट्टेवाडी, भोसे, चऱ्होली खु., दौंडकरवाडी, मरकळ, रेटवडी
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ६७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ६९७३
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १५५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ९३२
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ५८८६
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १२, आळंदी – ४, राजगुरूनगर – ५
# आजचे मृत्यू : ७० वर्षीय महिला तर ५८ व ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.