महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण ( जि. पुणे ) : खेड तालुक्यातील शिवसेनेचे प्रथम आमदार सुरेशभाऊ नामदेव गोरे ( वय ५७ ) यांचे आज ( दि. १० ऑक्टोबर ) सकाळी ९.१५ वाजता पुण्यातील रुबी हॉल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी, चुलते, पुतणे असा परिवार आहे. त्यांना कोरोना संसर्ग झाल्यापासून मागील २० दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या शांत व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी राजकारणात वेगळा ठसा उमटवला होता. ‘भाऊ’ या टोपण नावाने ते सर्वपरिचित होते.
एक संयमी नेतृत्व म्हणून भाऊंची ओळख तालुक्याला होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या भाऊंनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले होते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे विरोधक म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले होते. राजकीय गणिताच्या समीकरणात सुरेश गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी तीस हजारांवर मतांनी भाऊ यांनी दिलीप मोहिते पाटील यांना मात दिली होती. त्यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची नोंद झाली. विरोधकांवरही संयमी टीका करणारा हा नेता सदैव हसतमुख असायचा. कार्यकर्त्यांच्या कायम गराड्यात असणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने खेड तालुक्यात धक्का बसला असून मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.