महाबुलेटीन न्यूज
चाकण : शिवसेना शिष्टमंडळ व खेड विधानसभेचे माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत आज मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची मागणी केली. यावेळी खेड पंचायत समितीची मंजूर प्रशासकीय इमारतीची जागा बेकायदेशीर पद्धतीने जिल्हा परिषदेने महसूल विभागाला दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून आजवरच्या सर्व घडामोडींची इत्यंभूत माहिती देण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, स्व. मा. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनिषाताई गोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, उपसभापती ज्योती अरगडे, आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, केशव अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
—–
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
This website uses cookies.