महाबुलेटीन न्यूज । नाजीम इनामदार
राजगुरुनगर : खेड पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक येत्या मंगळवार दि.३१ ऑगस्ट २०२१ रोजी खेड पंचायत समितीच्या सभागृहात पार पडणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला असून दुपारी २ वाजता सभा होणार आहे.
दरम्यानच्या काळात नामनिर्देशन पत्राची छाननी आणि माघारीसाठी वेळ देण्यात येणार असल्याची माहिती पिठासीन अधिकारी तथा खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे. खेडच्या तहसीलदार यांच्यामार्फत १४ पंचायत समिती सदस्यांना निवडणुक प्रक्रीये बाबत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
कायदेशीर प्रकरणात अडकलेले माजी सभापती भगवान पोखरकर या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बाहेर येणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेनेच्या बंडखोर सदस्यांचे पद रद्द करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी दाखल केलेल्या निकालाकडे देखील आता तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने पक्षादेश बजावून सुद्धा पाच बंडखोर सदस्यांनी आपल्याच पक्षाच्या सभापतींवरील अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केल्याने आता शिवसेना कोणती भुमिका घेते? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
———-
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.