महाबुलेटीन न्यूज । चाकण
एकीकडे कोरोनाची लस मिळण्यासाठी सर्वसामान्य नागरिक पहाटेपासून रुग्णालयात रांगा लावत असताना दुसरीकडे लसीसाठी चक्क ४०० रुपयांची लाच घेताना चाकण ग्रामीण रुग्णालयातील एका हंगामी आरोग्य कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सचिन अरुण शिंदे ( रा.रासे, ता.खेड, जि. पुणे ) असे एसीबी पथकाने ताब्यात घेतलेल्या या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
चाकण ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवसांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणसाठी पैसे घेत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती, त्यानुसार पुणे लाचलुचपत विभागाला तक्रारदाराकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आज दुपारी दोनच्या सुमारास एसीबी पथकाने रुग्णालय आवारात सापळा रचून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रोख रक्कम स्विकारताना रंगेहात पकडून ही कारवाई केली. यानंतर दुपारी लसीकरण बंद करण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयातील इतर काही जणांची चौकशी सुरू केली आहे.
लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. शिंदे हा रुग्णालयात हंगामी/कंत्राटी कर्मचारी असून लसीकरण केंद्राबाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे तो काम करत होता. मात्र तो अधिकृत कर्मचारी आहे की नाही हे अद्याप समजले नाही. यासंदर्भात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
००००
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.