पुणे जिल्हा

खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड, पंचायत समितीवर अखेर राष्ट्रवादीचा झेंडा… ● जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने सभापती भगवान पोखरकर यांचा अर्ज बाद

खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड, पंचायत समितीवर अखेर राष्ट्रवादीचा झेंडा…
● जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने सभापती भगवान पोखरकर यांचा अर्ज बाद

महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

निवडणूक प्रक्रियेसाठी शिवसेनेचे भगवान पोखरकर, अंकुश राक्षे, ज्योती अरगडे, सुनीता सांडभोर, वैशाली जाधव, सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, मच्छीन्द्र गावडे हे आठ, राष्ट्रवादीचे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे हे चार, तर काँग्रेसचे अमोल पवार व भाजपचे चांगदेव शिवेकर असे एकूण १४ सदस्य उपस्थित होते. 

राजगुरूनगर येथील पंचायत समितीच्या शिवछत्रपती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली. सभापती पदासाठी एकूण दोन अर्ज आले होते. त्यामध्ये शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांचा अर्ज जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे बाद झाल्याने चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सभापती अरुण चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे प्रभारी सभापती चांगदेव शिवेकर, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी सभापती रामदास ठाकूर, माजी जि प सदस्य अरुण चांभारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, मयूर मोहिते, उमेश गाडे, सुभाष होले, हेमलता टाकळकर, सर्व पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार मोहिते यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर खरमरीत टीका केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने जास्तीत जास्त सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळेल, असे त्यांनी सूतोवाच केले.

आमदार मोहिते पाटील म्हणाले, “भगवान पोखरकर हे सभापती होण्यासाठी माझ्या पाया पडले होते; मात्र त्यांनी विश्वासघात केला. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ते सध्या तुरुंगात असून माझ्या हत्येचा कट रचत आहेत, अशी मला खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर खटला भरणार आहे.”

यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ५०० मीटर परीघ परिसरात वाहतूक बंद केल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तसेच आज पंचायत समिती वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी शेवटचा दिवस असतानाही निवडणुकीमुळे येथे प्रवेश बंद केल्याने नागरिकांची गैरसोय झाली. आता त्यासाठी मुदत वाढवून मिळेल काय असा सवाल नागरिकांकडून होत आहे.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

9 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.